शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हडपसर टर्मिनलचे ‘लॉकडाऊन’; किमान दीड वर्ष लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 17:40 IST

पुणे रेल्वे स्थानकावरील लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचा ताण कमी करण्यासाठी हडपसर स्थानकाचा विस्तार करण्याला २०१६ मध्ये मान्यता मिळाली.

ठळक मुद्देन्यायालयीन प्रकरणामुळे विलंबटर्मिनलसाठी लागणाऱ्या जागेच्या ताब्यावरून आता उच्च न्यायालयात दावा सुरू

पुणे : मागील काही वर्षांपासून सुरू असलेले हडपसर टर्मिनलचे काम पूर्ण होण्यास आणखी किमान दीड वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. टर्मिनलसाठी लागणाऱ्या जागेच्या ताब्यावरून आता उच्च न्यायालयात दावा सुरू आहे. त्यामुळे यावर्षीच हडपसर स्थानकातून लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.

पुणेरेल्वे स्थानकावरील लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचा ताण कमी करण्यासाठी हडपसर स्थानकाचा विस्तार करण्याला २०१६ मध्ये मान्यता मिळाली. तेव्हापासून हे स्थानक टप्प्याटप्याने विकसित केले जात आहे. नवीन इमारत, मार्गाचे दुहेरीकरण, फलाट आदी कामे सुरू होती. पण काही जणांनी जागेच्या ताब्यावरून पुण्यातील न्यायालयात दावा दाखल केला. त्याचा निकाल रेल्वेच्या बाजूने लागल्याने पुन्हा काम सुरू झाले. त्यामुळे यावर्षी हे स्थानक सुरू होणे अपेक्षित होते. पण संबंधित व्यक्तींनी त्याविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल केल्याने पुन्हा काम थांबले आहे. हा दावा निकाली निघाल्यानंतर काम सुरू होईल. त्यामुळे पुढील वर्षअखेरपर्यंत स्थानकाचे काम पुर्ण होईल. त्यासाठी निधीची कमतरता नाही, असे मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणु शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, पुणे रेल्वे स्थानकाच्या पुर्नविकासाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होण्यास लॉकडाऊनमुळे विलंब होणार आहे. मागील काही महिने मजुर न मिळाल्याने हे काम रेंगाळले आहे. तसेच काम पुर्ण होण्यास आणखी २ ते ३ वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.-------------प्रवाशांची महापालिकेने सोय करावीअनेक प्रवासी सध्या धावत असलेल्या रेल्वेगाड्यांसाठी काही तास आधीच येऊन पुणे स्थानकात थांबत आहेत. पण रेल्वेकडून केवळ तीन तास आधी येणाऱ्या  प्रवाशांनाच विश्रांती कक्ष उपलब्ध करून दिला जात आहे. इतर प्रवाशांना आवारातही थांबविले जात नाही. या प्रवाशांसाठी महापालिकेने स्वच्छतागृह व तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करावी, असे पत्र महापालिकेला दिल्याचे शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरrailwayरेल्वेHigh Courtउच्च न्यायालय