शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

वाहतूककोंडी फोडण्यावर असणार भर - डॉ. के. वेंकटेशम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 03:27 IST

अपघात झाल्यानंतर ट्रॅफिकमुळे रुग्णाला वेळेवर रुग्णालयात पोहोचविणे शक्य होत नसल्याची स्थिती सध्या पुण्यात आहे. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान, अंमलबजावणी व लोकशिक्षण या त्रिसूत्रीच्या आधारे शहरातील

पुणे : अपघात झाल्यानंतर ट्रॅफिकमुळे रुग्णाला वेळेवर रुग्णालयात पोहोचविणे शक्य होत नसल्याची स्थिती सध्या पुण्यात आहे. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान, अंमलबजावणी व लोकशिक्षण या त्रिसूत्रीच्या आधारे शहरातील वाढती वाहतूककोंडी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यावर पोलीस प्रशासनाचा भर असेल, असे मत नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात डॉ. वेंकटेशम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे उपस्थित होते. डॉ. वेंकटेशम म्हणाले, ‘‘वाहनचालकांना दंड आकारणे, कारवाई करणे हा पोलिसांचा उद्देश नाही; मात्र नागरिकांनीही वाहतुकीबाबत स्वयंशिस्त पाळली पाहिजे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर दंड न भरणाऱ्या व्यक्तींची वाहने जमा करण्यात येणार आहेत. तर, पोलिसांना धक्काबुक्की करणाºयांवर गंभीर कारवाई करण्यात येईल. त्यांच्यावर दाखल होणारे खटले जलद गतीने चालविण्यात यावेत, अशी विनंतीदेखील न्यायालयाला करण्यात येणार आहे’’

नागरिकांना तत्काळ मदत आणि सेवा मिळणे तसेच त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेवून त्यावर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी व्हॉटस्अप सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यात शुक्रवारपासून ८९७५२८३१०० आणि ८९७५९५३१०० दोन नवीन क्रमांक सुरू केले आहेत. नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक दिला असून त्यावर दररोज ३० ते ४० तक्रारी येतात. वाहतूक कोंडीची तक्रार करण्यासाठी पोलिसांनी आत्तापर्यंत तीन व्हॉटस्अ‍ॅप क्रमांक सुरू केले आहेत. वाहतुक विभागाशी संबंधित तक्रार करण्यासाठी ८४११८००१०० हा क्रमांक देण्यात आला आहे.बडी कॉप व सिटी सेफ अ‍ॅपची व्याप्ती वाढविणारनागरिकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या बडी कॉप आणि सिटी सेफ अ‍ॅपला चांगली पसंती मिळाली असून त्यातून अनेक गुन्हेगारांवर वचक बसविण्यात आला आहे. त्यामुळे या अ‍ॅपची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. सेवा नावाची एक यंत्रणा उभारली जाणार असून, त्याद्वारे नागरिकांनी केलेल्या तक्रारीचे काय झाले, याची माहिती त्यांना दिली जाणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.सायबर क्राईम नवे आव्हानसायबर क्राईम करणाºया व्यक्ती पोलिसांच्या तुलनेत तंत्रज्ञानात पुढे आहे. कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्याच्या प्रकरणापासून सायबर गुन्हे शाखेतील कर्मचाºयांना अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. अशा प्रकारचे गुन्हे हातळण्यासाठी खासगी संस्थांची मदत घेण्यात येत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झाल्यानंतर सायबर पोलीस ठाणेदेखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. वेंकटेशम यांनी दिली.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे