शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Pune: माझे ऐक, नाहीतर एकतरी मर्डर करतोच, धमकी दिल्ली त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 10:02 IST

Pune Crime News: पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी माथेफिरू तरुणाने तरुणीवर कोयत्याने केलेल्या हल्ल्यामुळे शहर थरारले. 

पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी माथेफिरू तरुणाने तरुणीवर कोयत्याने केलेल्या हल्ल्यामुळे शहर थरारले.  पीडित तरुणी परीक्षा असल्याने बसने ग्राहक पेठ येथे उतरली. त्यावेळी शंतनू समोर होता. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने  तुझ्याशी बोलायचे नाही, आईशी बोल, असे सांगितले. तरुणीने तिच्या दुसऱ्या मित्राला बोलावून घेतले.

तरुणी मित्राच्या दुचाकीवरून जाऊ लागताच शंतनूने तिचा हात धरून ‘माझे ऐक नाही तर तुला आज मारूनच टाकतो, आज एकतरी मर्डर करतोच’, अशी धमकी दिली. धमकी ऐकून तरुणीच्या मित्राने दुचाकी थांबविली.  तोपर्यंत शंतनूने बॅगेतून कोयता काढून त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्याने वार चुकवला आणि तो पळाला. त्यानंतर शंतनूने मोर्चा तरुणीकडे वळविला. तो तिच्या डोक्यात वार करणार, तितक्यात खाली पडली. शंतनूचा वार मनगटाला लागला. शंतनूला ढकलून ती पळू लागली. तोपर्यंत लोक जमले. तेव्हा त्याने त्यांच्यावर कोयता उगारला. तरीही, त्यातील काही जणांनी त्याला पकडले. लोकांनी त्याला बेदम चोप देत पोलिस चौकीत नेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सदाशिव पेठेतील घटना अतिशय धक्कादायक आहे. प्रेमसंबंधातून हा प्रकार घडला असला, तरी अशा माथेफिरूंना जरब बसावी, यासाठी नव्याने फिक्स पॉइंट तयार करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी शाळा, कॉलेज, विविध क्लास आहेत, तरुण-तरुणींची एकत्र येण्याची ठिकाणे आहेत, त्या-त्या ठिकाणची गस्त वाढविण्यात येणार आहे. - रितेशकुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

मी दुकानामध्ये काम करीत होतो. माझं लक्ष अचानक एका मुलीकडे गेलं. ती पेरुगेट पोलिस चौकीच्या दिशेने पळत आली. तिच्या मागे एक मुलगा पळत आला. त्याच्या हातात कोयता होता. त्याने त्या मुलीवर वार करण्याचा प्रयत्न केला. कोयत्याचा वार तिच्या हातावर झाला. हे दिसताक्षणी मी धावत तिथे गेलो. माझ्यासोबत एक मुलगा होता. त्याने त्या मुलाला पकडले. मी त्या मुलीला धीर देत पोलिस चौकीमध्ये नेले. तेथे कोणी नव्हते. मग, आम्ही पोलिस चौकीचे दार आतून लावून घेतले. काही वेळाने पोलिस तेथे पोहोचले.- गजानन सूर्यवंशी, प्रत्यक्षदर्शी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे