कोरेगाव मूळच्या उपसरपंचपदी लीलावती बोधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:13 IST2021-09-23T04:13:06+5:302021-09-23T04:13:06+5:30
मनीषा कड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त होते. सरपंच विठ्ठल शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. ...

कोरेगाव मूळच्या उपसरपंचपदी लीलावती बोधे
मनीषा कड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त होते. सरपंच विठ्ठल शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत निर्धारित वेळेत फक्त लीलावती बोधे यांचाच अर्ज आल्याने विठ्ठल शितोळे यांनी लीलावती बोधे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. ग्रामविकास आधिकारी राजेंद्र कदम यांनी निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्याचे काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब बोधे, भानुदास जेधे, दत्तात्रय काकडे, सचिन निकाळजे, सदस्या अश्विनी कड, वैशाली सावंत, राधिका काकडे, मंगल पवार, पोलीस पाटील वर्षा कड, तंटामुक्ती अध्यक्ष संपत डिंबळे, बबन कोलते, जयसिंग भोसले, मानसिंग कड, धैर्यसिंग शितोळे, प्रकाश काकडे, राजेंद्र बोधे, संतोष बोधे, विठ्ठल कोलते, बाळासाहेब बोधे, प्रवीण शितोळे, अशोक कारंडे, अमित सावंत, सचिन कड आदी उपस्थित होते.
220921\img-20210920-wa0027~2.jpg
लिलावती बापूसाहेब बोधे, उपसरपंच, कोरेगांव मुळ.