शिधापत्रिकावरील साखरेचा तिढा सुटण्याची शक्यता

By Admin | Updated: May 7, 2014 04:20 IST2014-05-06T22:07:25+5:302014-05-07T04:20:26+5:30

पुणे शासनाने साखर कारखानदारांकडे २७रूपये किलो दराने मागणी केल्यावर कारखानदार ३१रूपयांवर ठाम राहिल्याने शासन आणि साखर कारखानदार यांच्यात दरावरून झालेला तिढा सुटणार आहे.

Likely to get rid of ration cards on ration card | शिधापत्रिकावरील साखरेचा तिढा सुटण्याची शक्यता

शिधापत्रिकावरील साखरेचा तिढा सुटण्याची शक्यता

साखर महासंघाकडून शासन खरेदी करणाार
पुणे : पुणे शासनाने साखर कारखानदारांकडे २७रूपये किलो दराने मागणी केल्यावर कारखानदार ३१रूपयांवर ठाम राहिल्याने शासन आणि साखर कारखानदार यांच्यात दरावरून झालेला तिढा सुटणार आहे. शिधापत्रिकाधारकांना द्यावयाच्या साखरेची खरेदी शासनाने साखर महासंघाकडून करण्याचा निर्णय केला असून साखरेच्या दरावर महासंघ आणि शासनाची या आठवड्यात बैठक होणार आहे.
साखर नियंत्रणमुक्त झाल्यानंतर लेव्ही साखर बंद झाली.त्यामुळे शिधापत्रिकांवर साखर पुरविण्याचा प्रश्न निर्माण झाला.जिल्हाधिकारी स्तरावर निविदा काढून खुल्या बाजारातून साखरेची खरेदी करावी आणि साडेतेरा रूपये किलो दराने ती स्वस्त धान्य दुकानांमधून पुरवावी असे शासनाने ठरविले होते.त्यानुसार पुण्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये खरेदीच्या निविदा काढण्यात आल्या.मात्र त्यासाठी मोठी अनामत रक्कम ठेवण्याचा नियम केल्याने कारखानदार आणि व्यापार्‍यांनी ही रक्कम परवडत नसल्याची तक्रार केली होती.
४ जिल्ह्यांमध्ये निविदांना मुदतवाढ देण्यात आली.त्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदत आहे.मात्र त्यामुळे साखर खरेदी होऊ न शकल्याने नागरिकांना साखर कशी उपलब्ध करावी असा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या ३ महिन्यांपासून साखर मिळू शकली नाही.
जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले की शहरासाठी १हजार४३८ आणि ग्रामीण भागासाठी २ हजार ४७८ क्विंटल साखरेची आवश्यकता असते.साखरेच्या दरामुळे खरेदीचा निर्णय होऊ शकलेला नाही.बाजारभावाने खरेदी केली तरी शिधापत्रिकाधारकांना साडेतेरा रूपये किलो दराने साखर द्यावी लागणार आहे.गेल्या आठवड्यात पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक झाली तेव्हा तिढा सुटेल असे सचिवांनी सांगितले आहे.

Web Title: Likely to get rid of ration cards on ration card