शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पालिकांच्या एलबीटीला मिळणार अभय ?

By admin | Updated: March 2, 2015 03:20 IST

केंद्र शासनाने गुड्स व सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) लागू केल्यानंतर राज्यातील स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याचे आश्वासन राज्यकर्त्यांनी दिले होते

पुणे : केंद्र शासनाने गुड्स व सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) लागू केल्यानंतर राज्यातील स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याचे आश्वासन राज्यकर्त्यांनी दिले होते. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्पात जीएसटीची अंमलबजावणी १ एप्रिल २०१६ पासून होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच, शासनाच्या पातळीवरही एलबीटीला पर्यायी कराविषयी संभ्रम आहे. त्यामुळे महापालिकांच्या एलबीटी कराला आणखी एक वर्ष ‘अभय’ मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील मुंबई वगळता पुण्यासह सर्व महापालिकांमध्ये एक एप्रिल २०१३ पासून जकात कर रद्द करून स्थानिक संस्था कराची अंमलबावणी सुरू झाली. पुणे महापालिकेला पहिल्याच वर्षी जकातीपेक्षा एलबीटीमुळे जादा उत्पन्न मिळाले. एका बाजूला एलबीटीची यशस्वी अंमलबजावणी होत असताना निवडणुकीच्या तोंडावर व्यापाऱ्यांनी एलबीटी रद्दची मागणी केली. तात्कालीन काँग्रेस आघाडी सरकारला पर्यायी कराचा स्रोत न मिळाल्याने त्यांनी निर्णय घेतला नाही. मात्र, भाजपा-शिवसेना युतीच्या नेत्यांनी राज्यात सत्तेत आल्यानंतर तातडीने एलबीटी कर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे राज्यातील युती शासनाने एक एप्रिल २०१५ पासून एलबीटी रद्द करावा, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. महापालिकांना पर्यायी उत्पन्नाचा स्रोत दिल्याशिवाय एलबीटी रद्द करणे शासनाला अडचणीचे झाले आहे. केंद्र शासनाचा ‘जीएसटी’ लागू झाल्याशिवाय ‘एलबीटी’ रद्द करता येणार नसल्याचे काही दिवसांपूर्वी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे केंद्राच्या अर्थसंकल्पात एप्रिल २०१५ पासून जीएसटी लागू होण्याची अपेक्षा होती. मात्र, बजेटमध्ये एप्रिल २०१६ पासून जीएसटी लागू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय राज्य शासनाचे बजेट अवघ्या दोन आठवड्यावर आले, तरी एलबीटीला पर्यायी करावर एकमत झालेले नाही. एखादा निर्णय घेण्यासाठी किमान महिन्याचा अवधी आवश्यक असतो. परंतु, राज्य शासनाची एलबीटी रद्द करण्याविषयी संभ्रमावस्था आहे. त्यामुळेच राज्य शासनाचे नगरविकास सचिव यांच्याबरोबर महापालिका आयुक्तांची २६ फेब्रुवारीला होणारी बैठक रद्द झाली. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून एलबीटी रद्द होण्याची शक्यता धुसर आहे, अशी माहिती सुत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली.