शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंप्रमाणे पुण्यातील अनेक रिक्षावाले राजकारणाकडे वळले; कोणी महापौर तर कोणी नगरसेवक...

By नारायण बडगुजर | Updated: July 24, 2022 17:31 IST

आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहचलेल्या या रिक्षाचालकांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला

पिंपरी : रिक्षावाला असलेले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर राज्यातील रिक्षावाले चर्चेत आले. रिक्षावाल्यांनी रस्त्यावर येत आनंद व्यक्त केला. शिंदे यांच्याप्रमाणेच पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक रिक्षावाल्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन केले. कोणी महापौर झाले, कामगार नेते झाले, तर काहींनी नगरसेवक होऊन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. पण स्वत:चा रिक्षा व्यावसाय सोडला नाही. आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहचलेल्या या रिक्षाचालकांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे.

रिक्षाने खरी साथ दिली, अजूनही देत आहे

मी पुणे शहरात १९८३ ते ८५ अशी दोन वर्षे रिक्षा व्यवसाय केला. ड्रायव्हर होतो. शहरात सगळीकडे फिरायचो. गल्लीबोळ माहिती झाले, त्याचबरोबर माणसेही समजली. त्यातही गरीब, उपेक्षित अशा माणसांबरोबर माझी लगेच जवळीक व्हायची. त्यांच्या अडचणी माझ्या अडचणी व्हायच्या. त्यातूनच समाजकार्याची आवड निर्माण झाली. रिक्षाचालक असल्यामुळेच जनसंपर्क वाढला. त्यांना मदत करायला हवी, अशी भावना निर्माण झाली. सन १९८५ ला मित्रांच्या आग्रहामुळे महापालिका निवडणूक लढवली. पराभूत झालो. पुन्हा रिक्षा सुरू केली, मात्र मनातून राजकारण जात नव्हते. पुन्हा सन १९९२ ला निवडणूक लढवली व निवडून आलो. तेव्हापासून सलग ५ वेळा निवडून आलो. सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष अशी पदे मिळाली. त्यावर काम करता आले. रिक्षाची साथ मिळाल्यानेच हे सगळे शक्य झाले. त्यामुळेच मी अजूनही रिक्षाचालकांमध्ये बसतो, उठतो, त्यांच्यासाठी भांडतोही. - सुभाष जगताप, माजी नगरसेवक.

अजूनही रिक्षा व्यवसायात आहे...

मी १९७२ ते १९७५ अशी रिक्षा चालवत होतो. रिक्षाचालकांचे चांगले संघटन केले होते. त्यात पुन्हा पूर्व भागातील गणपती मंडळाचा कार्यकर्ता. माझ्या दोन रिक्षा होत्या. एक काकांचे व एक माझे असे परमिट होते. माझे परमिट अजूनही कायम आहे. चांगल्या जनसंपर्कामुळे मला मित्रांनीच १९८५ मध्ये महापालिका निवडणुकीला उभे केले. पराभूत झालो, पण खचलो नाही. १९९२ मध्ये पुन्हा उभा राहिलो व निवडून आलो. त्यानंतर अजूनपर्यंत राजकारणात आहे. एकदा स्वीकृत नगरसेवक झालो. शिक्षण मंडळाचा उपाध्यक्ष होतो. पीएमटीचा अध्यक्ष झालो. त्यावेळी मी रिक्षा संघटना व पीएमटी अशी संयुक्त बैठक घडवून आणली. लांबच्या प्रवासाला बस स्वस्त पडेल व जवळच्या प्रवासाला रिक्षा अशी तिकिटांची रचना करून घेतली. शरद पवार माझे आदर्श आहेत. त्यांच्याबरोबरच काँग्रेसमधून बाहेर पडलो. अजूनही राजकारणात सक्रिय आहे, मात्र रिक्षाची साथ कधीच सोडली नाही. माझ्या निवडणूक प्रचारात, पक्षाच्या पदयात्रेत, माझी रिक्षा असतेच. आता मी रिक्षा चालवत नाही; पण रिक्षा व्यवसायात अजूनही आहे व त्याचा अभिमानही आहे. - रवींद्र माळवदकर, माजी नगरसेवक

रिक्षाच्या जनसंपर्काने महापौर झालाे...

जाधववाडी, चिखली येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील राहुल जाधव १९९९ ते २००२ या कालावधीत चिखली ते पिंपरी या मार्गावर सहा आसनी रिक्षा चालवायचे. पिंपरीसाठी चार रुपये आणि केएसबी चौकासाठी दोन रुपये प्रतिप्रवासी भाडे होते. दिवसभरात तीनशे ते साडेतीनशे रुपये यायचे. त्यावेळी डिझेलचा दर प्रतिलिटर १२ रुपयांपर्यंत होता. डिझेलचा खर्च वजा करून २०० ते २५० रुपये दररोज मिळायचे. शहरात सहा आसनी रिक्षाला २००२मध्ये बंदी आली. त्यामुळे मारुती व्हॅन घेऊन चिखली ते पिंपरी अशी प्रवासी वाहतूक केली. दरम्यान, राज ठाकरे यांनी २००६मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. त्यावेळी मनसेमध्ये प्रवेश केला आणि राजकारणात आलो. त्यानंतर २०१२मध्ये महापालिकेची निवडणूक लढविली. त्यावेळी प्रचार करताना मला रिक्षाचालक असल्याचा मोठा फायदा झाला. माझ्या रिक्षातून प्रवास करणारेच माझे मतदार होते. त्यांनी भरभरून मतदान केले. त्यामुळे नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक लढविली. भाजपने मला महापौरपदाची संधी दिली. रिक्षा चालविताना प्रवाशांसोबत झालेल्या ओळखीतून मी घराघरात पोहोचून प्रवाशांच्या मनामनांत स्थान मिळवू शकलो. रिक्षा व्यवसायामुळेच हे शक्य झाल्याचे मी प्रामाणिकपणे कबूल करतो.  - राहुल जाधव, माजी महापौर

माझ्या प्रचारात ३०० रिक्षावाले होते सहभागी...

मुळशी तालुक्यातील नेरे येथील बाळासाहेब ओव्हाळ यांच्या लहानपणीच आई-वडिलांचे निधन झाले. चुलत्यांनी सांभाळ केला. वसतिगृहात राहून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर मित्राच्या ओळखीने मुंबई येथे पेंटिंगचे तसेच मजुरीचे काम केले. दोन वर्षांनंतर १९८९ मध्ये पुन्हा पुण्यात परतलो. मात्र काम मिळत नव्हते. एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करीत असताना टेम्पो चालवायला शिकून लायसन्स काढले. त्यानंतर १९९६ मध्ये सहाआसनी रिक्षा घेतली. तेव्हापासून निगडी ते भोसरी मार्गावर सहा वर्ष रिक्षा चालवली. मोठी मागणी असल्याने जुन्या सहाआसनी रिक्षांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यातून प्रगती होत २००७ मध्ये जेसीबी आणि ट्रक घेतला. त्यानंतर बांधकाम व्यवसाय सुरू केला. २०१४ पर्यंत व्यवसायात मोठे यश मिळाले. दरम्यान, २०१३ मध्ये सरपंचपदासाठी भावाला मदत केली. भाऊ सरपंचपदी निवडून आला. त्यानंतर समाजासाठी काही तरी करायचे म्हणून सामाजिक कार्य सुरू केले. लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महापालिकेची २०१७ मधील निवडणूक लढविली. महापालिका निवडणुकीत मला रिक्षावाल्यांची मोठी साथ लाभली. माझ्या प्रचारात ३०० रिक्षावाले सहभागी झाले होते. रॅलीत त्यापेक्षा जास्त रिक्षावाल्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे दोन किलोमीटरपर्यंत रिक्षांची रांग लागली होती. त्यावेळी मला रिक्षावाल्यांची ताकद समजली आणि मी निवडून येणार, असे तेव्हाच स्पष्ट झाले होते. त्यामुळे मी रिक्षावाला असल्याचा अभिमान आजही वाटतो. आजही रिक्षाने राउंड मारतो. रिक्षा व्यवसायातील मित्रांना भेटतो. खूप आनंद होतो, भारी वाटते. - बाळासाहेब ओव्हाळ, माजी नगरसेवक

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीauto rickshawऑटो रिक्षाPoliticsराजकारण