शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

परवाना नुतनीकरणाचा तिढा सुटणार : आयएमएची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 21:23 IST

शहरात सुमारे ६५० रुग्णालये असून त्यातील बहुतांश रुग्णालयांचे परवाने ३१ मार्च २०१८ रोजी संपत होते. नुतनीकरणासाठी तीन महिने आधी महापालिकेकडे अर्ज करणे आवश्यक असते.

ठळक मुद्दे नगरविकास राज्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगावेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयात विविध नियम व अनावश्यक कागदपत्रांची मागणी रुग्णालयाच्या परवाना नुतनीकरणाबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही नवीन आदेश नाही

पुणे : शहरातील रुग्णालयांच्या नुतनीकरणाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. नगरविकास राज्यमंत्र्यांनी महापालिकेतील आरोग्य अधिकारी व इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी एकत्रित बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परवाना नुतनीकरणासाठी यापुर्वी अस्तित्वात असलेल्या नियमानुसारच कागदपत्रे घ्यावीत, असे आदेश मंत्र्यांनी दिल्याची माहिती ‘आयएमए’ कडून गुरूवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.शहरात सुमारे ६५० रुग्णालये असून त्यातील बहुतांश रुग्णालयांचे परवाने ३१ मार्च २०१८ रोजी संपत होते. नुतनीकरणासाठी तीन महिने आधी महापालिकेकडे अर्ज करणे आवश्यक असते. त्याप्रमाणे बहुतेक रुग्णालयांनी अर्ज केले आहेत. मात्र, यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयात विविध नियम व अनावश्यक कागदपत्रांची मागणी होऊ लागली आहे. यामुळे आजपर्यंत अनेक रुग्णालयांचे परवाना नुतनीकरणे होऊ शकले नाही, असा दावा आयएमएकडून करण्यात आला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी बुधवारी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीस सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव, आयएमए पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. पद्मा अय्यर व अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. ‘आयएमए’च्या वतीने बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती गुरूवारी देण्यात आली. यावेळी डॉ. अय्यर, नियोजित अध्यक्ष डॉ. संजय पाटील, सचिव डॉ. राजकुमार शहा, खजिनदार, डॉ. बी. एल. देशमुख, उपाध्यक्ष डॉ. आरती निमकर, डॉ. राजु वरयानी, डॉ. अविनाश भुतकर, डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. जयंत नवरंगे आदी उपस्थित होते. यापूर्वी परवाना नुतनीकरणासाठी मुंबई परिचारिका कायद्यानुसार आवश्यक कागदपत्रे घेतली जात होती. यावर्षी त्यामध्ये अनावश्यक कागदपत्रांची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे नुतनीकरणाचे काम रेंगाळले आहे. कायदेशीर आधार नसलेल्या कागदपत्रांची मागणी केली जात आहे. त्याला संघटनेचा विरोध आहे. त्यानुसार मंत्र्यांनी याबाबत यापुर्वी अस्तित्वात असलेल्या नियमानुसारच कागदपत्रे घेण्याचे आदेश संबंधितांना दिल्याची माहिती डॉ. अय्यर यांनी दिली.शासनाच्या आदेशानुसार कार्यवाहीनगरविकास राज्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेविषयी बोलताना सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, रुग्णालयाच्या परवाना नुतनीकरणाबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही नवीन आदेश आलेले नाहीत. हे आदेश आल्यानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल. त्यामुळे सध्या नुतनीकरणाबाबत जी प्रक्रिया सुरू आहे, ती सुरूच राहील.   

---------------‘दिशा’मध्ये डॉक्टर वेठीसकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तयार केलेल्या ‘दिशा’ या कायद्याच्या मसुद्यात अनेक त्रुटी आहेत. सर्व रुग्णांची माहिती संगणकावर साठवावी लागणार आहे. या माहितीचा दुरूपयोग झाल्यास संबंधितांना पाच वर्ष तुरूंगवास किंवा पाच लाख रुपयांच्या दंडाची तरतुद कायद्यात आहे. त्यामुळे डॉक्टरांमध्ये अस्वस्थता असल्याने मसुद्याला आयएमएकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे.

  

 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यState Governmentराज्य सरकारhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय