शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बापरे काय ही गर्दी! कोरोनाला विसरून आंदोलन; बैलगाडा शर्यत चालू करूद्या, अन्यथा पुणे - मुंबई महामार्ग बंद करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 16:13 IST

वडगाव मावळ येथे बैलगाडा संघटनेचे आंदोलन, येत्या पंधरा दिवसात शासनाने निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

ठळक मुद्देबैलगाडा शर्यत बंदी असलेली केस या संदर्भात सरकारने लक्ष घालावे

वडगाव मावळ :  बैलगाडा शर्यत चालू करावी व इतर मागण्यांसाठी मावळ तालुका बैलगाडा संघटनेच्या वतीने मोर्चा काढून वडगाव येथील पंचायत समिती चौकात आंदोलन करण्यात आले. यामध्ये सर्व पक्षीय पदाधिकारी सहभागी झाले होते. येत्या पंधरा दिवसात शासनाने निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन करून द्रुतगती महामार्ग बंद करण्यात येईल असा ईशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब भेगडे यांच्यासह गाडा मालकांनी दिला. वडगाव येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात बैलगाडा मालकांची बैठक झाली. त्यानंतर मोर्चा काढण्यात आला. परंतु याठिकाणी कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवल्याचे चित्र दिसून आले. 

शेतक-यांना बैलजोडी व बैलगाडी खरेदीसाठीचे अनुदान सन २०१६-१७ च्या आदेशाची अंमलबजावणी करून मिळावी. संविधान कलम ४८ प्रमाणे शेतक-यांच्या जुंपणीची यादी जाहिर करावी. जनावरांच्या वंशवृध्दीसाठी शासन मान्य प्रदर्शन भरवावे. बैलाच्या व्यायामासाठी पळणे, पोहण्यास परवानगी द्यावी, बैलाची शारिरिक क्षमता धावण्याची सिध्द करून तो पळू शकतो का याचा परिक्षक अहवाल तयार करावा, धावण्याची क्षमता सिध्द झाल्यास  पारंपारीक बैलाची मैदाने खेळ योग्य नियम व अटी लावुन चालू करावीत, बैल, गाय वासरू कत्तलखान्यात कापण्यासाठी परवानगी देऊ नये.

वरील मागण्या व सुप्रीम कोर्टातमध्ये बैलगाडा शर्यत बंदी असलेली केस या संदर्भात सरकारने लक्ष घातले नाही तर येत्या १५ दिवसात राज्यव्यापी आंदोलन मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग करण्यात येईल असा ईशारा या वेळी देण्यात आला. या वेळी तहसीलदार मधुसुदन बर्गे यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

यावेळी मावळ तालुका बैलगाडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब भेगडे, माजी मंत्री बाळा भेगडे, सुधाकर शेळके, संदिप शेळके, रामनाथ वारिंगे, यांच्या सह मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर भागातील गाडा मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळPuneपुणेAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारCourtन्यायालयPoliceपोलिस