थकलेल्या मनाला उभारी देऊन कोरोनावर मात करू या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:11 IST2021-03-01T04:11:46+5:302021-03-01T04:11:46+5:30

हडपसर - कोरोना महामारी अजून संपलेली नाही. त्यामुळे थकलेल्या मनाला उभारी देत नव्या जोमाने महामारीवर मात करायची आहे. त्यासाठी ...

Let's overcome the corona by lifting the tired mind | थकलेल्या मनाला उभारी देऊन कोरोनावर मात करू या

थकलेल्या मनाला उभारी देऊन कोरोनावर मात करू या

हडपसर - कोरोना महामारी अजून संपलेली नाही. त्यामुळे थकलेल्या मनाला उभारी देत नव्या जोमाने महामारीवर मात करायची आहे. त्यासाठी सर्वांनी नियम पाळणे आवश्यक आहे, तरच कोरोनाला आपण हरवू शकतो, असे मत मुंबईचे प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी व्यक्त केले.

असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सलटंट पुणे व नोबल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने ‘जिंदगी रिवाइण्ड’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता, एएमसीचे अध्यक्ष व नोबल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने, कार्यकारी संचालक डॉ. एच. साळे, डॉ. आर्या, डॉ. किरण शाह, विश्वराज हॉस्पिटलच्या डॉ. अदिती कराड, डॉ. चेतन पांडे, कोविड केअर हॉस्पिटलचे डॉक्टर उपस्थित होते.

या वेळी कोविड-19वर मात केलेल्या डॉक्टरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. दिलीप माने म्हणाले की, आमचे सर्व हॉस्पिटल आणि डॉक्टर असेच कार्यरत राहून लोकांना कोरोनाकाळात सेवा अखंड देत राहतील.

डॉ. रोशनी कावले, डॉ.अभय महिन्द्रे आणि डॉ. अर्चना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हिमांशू पेंडसे आणि डॉ. अमर शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. चेतन म्हस्के, डॉ. साधना धर्माधिकारी, डॉ. दीपा पाठक, डॉ. गौतम साळुंखे, डॉ. नागनाथ मस्तुद, डॉ. अनिल लोणकर, डॉ. स्वाती डोळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

Web Title: Let's overcome the corona by lifting the tired mind