वडगावशेरीचा विकास करू
By Admin | Updated: January 10, 2017 03:38 IST2017-01-10T03:38:19+5:302017-01-10T03:38:19+5:30
वडगावशेरीच्या समतोल विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वडगावशेरीत सात एकरमध्ये

वडगावशेरीचा विकास करू
चंदननगर : वडगावशेरीच्या समतोल विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वडगावशेरीत सात एकरमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानातील मुलांसाठी ट्रेन, खेळणी, म्युझिकल कारंजे, मातीचा ट्रॅक, ओपन जिम, आॅक्सिजन झोन, पंचकर्म ट्रॅक, समुद्रातील रेती, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले.
या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, मंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक योगेश मुळीक, नगरसेविका सुनीता गलांडे, संदीप जऱ्हाड, संतोष घोलप, संतोष जाधव, अर्जुन जगताप, सचिन सातपुते, संतोष जाधव, श्रीधर गलांडे असून, वडगावशेरीतील सर्वांत मोठे उद्यान साकारले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष घोलप यांनी केले, तर उपस्थितांचे स्वागत व आभार नगरसेवक योगेश मुळीक यांनी मानले.
या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता गलांडे, स्वाभिमान संघटना पुणे शहर अध्यक्ष व युवक काँग्रेसचे सचिन सातपुते, शिवसेना शिववाहतूक सेनेचे शहराध्यक्ष सोमनाथ पठारे, छावा संघटनेचे अध्यक्ष धनंजय जाधव, राहुल भंडारी, काँग्रेसचे चंद्रकांत जंजिरे, माजी नगरसेविका सुलभा क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
(वार्ताहर)