शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला मोकळेपणाने बोलू द्या.. विद्यार्थ्यांची राज्यपालांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 21:53 IST

विद्यापीठे म्हणजे तुरूंग नसून शिक्षणाचे मुक्त मंदिर आहे.

ठळक मुद्देफुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीनागरिकत्व नोंदणी व दुरूस्ती कायद्याच्या निषेध करणारे निवेदन

पुणे : विद्यापीठे म्हणजे तुरूंग नसून शिक्षणाचे मुक्त मंदिर आहे. तिथे विद्यार्थ्यांना मोकळेपणाने बोलू वावरू देणे आवश्यक आहे, त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील सुरक्षेविषयीच्या जाचक अटी व नियम रद्द करण्यात यावेत या मागणीसह नागरिकत्व नोंदणी व दुरूस्ती कायद्याच्या निषेध करणारे निवेदनही विद्यार्थ्यांच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आले.विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी राज्यपाल बुधवारी विद्यापीठात आले होते. फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या पदाधिकाºयांनी त्यांची भेट घेतली व त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. सुरक्षेच्या विषयाचा बाऊ करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बंधने आणली जात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी राज्यपालांकडे केली.सतीश गोरे, कमलाकर शेटे, सतीशकुमार पडोळकर, रुकसाना शेख, मोनाली अवसरमल, सागर अलकुंटे, अहमद शेख हे अन्य विद्यार्थी संघटनांचे प्रमुखही यावेळी उपस्थित होते. त्यांनीही या निवेदनावर स्वाक्षºया केल्या. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा व नागरिकत्व सुधारणा कायदा याला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. त्यांच्याबरोबर चर्चा करण्याऐेवजी केंद्र सरकार पोलिसी बळ वापरून त्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची टिकाही निवेदनात करण्यात आली आहे.दुसºया निवेदनात राज्यातील विद्यापीठांमधल्या काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. पुणे विद्यापीठातील कुलसचिवांच्या अनधिकृत वेतनवाढी प्रकरणाची चौकशी करावी, विद्यार्थ्यांच्या गुणवाढी प्रकरणात सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंना निलंबित करावे, देशातल्या सर्व विद्यापीठांमधील फी वाढ मागे घ्यावी, संशोधन करण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी, शिक्षण स्वस्त व्हावे यासाठी कृती आराखडा तयार करावा, बेरोजगारीवर उपाययोजना करावी या मागण्याचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठStudentविद्यार्थीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक