शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गदिमांच्या स्मारकावरून सुरु असलेले 'ते' पेल्यातील वादळ आता संपू दे..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 19:38 IST

गदिमांच्या 43 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित काव्यजागर कार्यक्रमा आडून छुपे आंदोलन करण्यात येत असल्याचा ठपका ठेवत त्यात सहभागी होण्यास माडगूळकर कुटुंबीयांनी विरोध दर्शविला होता.

ठळक मुद्देगदिमांच्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात काव्यजागर..गदिमांचे स्मारक झालेच पाहिजे अशी एकमुखी मागणी...

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये जी काही स्मारकावरून वादावादी सुरु झाली. ते पेल्यातील वादळ आता संपू दे आणि गदिमांचे स्मारक करायचे ठरले आहे तर मग सर्वांनी एकत्र येऊन मदत करूयात, असे आवाहन आनंद माडगूळकर यांनी केले. या काव्य जागर कार्यक्रमात माडगूळकर कुटुंबीय सहभागी होणार नाही असं म्हटलं गेलं होतं तरी मी महापौरांनी घोषणा करण्यापूर्वीच संयोजकांना शब्द दिला होता. तो शब्द मी पाळला. यावेळी  ‘गीतरामायणा’तील काही रचना मी सादर केल्या.   

‘घन घन  माला नभी दाटल्या, कोसळती धारा’.. महाकवी गजानन दिगंबर माडगूळकर यांच्या काव्यपंक्तीतील हे शब्द उच्चारताच पावसाच्या सरी कोसळू लागल्या अन गदिमांना आदरांजली वाहणारे सारे कवी, कलाकार, शाहीर, साहित्यिक मंडळी त्या आनंदात चिंब भिजले. फुलांनी गदिमांचा रेखाटलेला चेहरा..आकर्षक रंगावली.. गरूड गणपतीच्या प्रांगणात एकत्र आलेले कलावंत...अन गणेश मंदिराच्याच परिसरातच होणा-या कार्यक्रमामुळे  ‘गजानन’ माडगूळकरांचा उल्लेख करून जुळून आलेल्या योगायोगाबददल उपस्थितांकडून उमटलेल्या प्रतिक्रिया... अशा उत्साही वातावरणात गदिमांच्या 43 व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी काव्य जागर पार पडला. यावेळी ‘गदिमांचे स्मारक झालेच पाहिजे अशी सर्वांनी एकमुखाने मागणी केली.

       कलावंत रसिकांतर्फे गदिमा स्मारकासाठी छेडलेल्या आंदोलनवजा काव्य वाचनात शंभरहून अधिक लोकांनी सहभाग घेतला. यामध्ये गदिमांचे सुपुत्र आनंद माडगूळकर,माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले, शाहीर दादा पासलकर, प्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर, ज्येष्ठ गायक प्रमोद रानडे, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, मसापचे कार्यवाह बंडा जोशी, निवेदक आनंद देशमुख आणि सामान्य रसिक शशिकांत सांबा यांचा समावेश होता. त्याला इतर भाषिकांचीही जोड मिळाली. आंतरराष्ट्रीय वक्ते अनीस चिश्ती (उर्दू), स्वाती दाढे (बंगाली), हेमंत पुणेकर (गुजराती), डॉ. मंगेश कश्यप (इंग्रजी) यांनी गदिमांच्या भाषांतरित कवितांच्या सादरीकरण केले. संयोजन समिती प्रमुख प्रदीप निफाडकर, कवी मनोहर सोनावणे, प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर, कवी धनंजय तडवळकर, सुप्रस्द्धि गायक अन्वर कुरेशी, बाल कवयित्री वल्लरी देशमुख, उर्मिला कराड अशा कलावंत रसिकांनी याकार्यक्रमाला चार चाँद लावले.           दरम्यान, गदिमांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पंचवटी निवासस्थानी तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गदिमांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. गदिमांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात गदिमांचे चिरंजीव आनंद माडगूळकर, नातू सुमित्र माडगूळकर आणि सुनील महाजन उपस्थित होते. साहित्य परिषदेत झालेल्या कार्यक्रमामध्ये गदिमांच्या ग्रंथांचे पूजन करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी  माडगूळकर कुटुंबीयांसह प्रा उल्हास बापट, संत साहित्याचे अभ्यासक डॉ रामचंद्र देखणे, साहित्यिक न. म. जोशी, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त राम कोल्हटकर,परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाहप्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार,उपस्थित होते.-----------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाliteratureसाहित्य