कचराप्रश्नाकडे ग्रामस्थांचीच पाठ
By Admin | Updated: November 29, 2014 00:07 IST2014-11-29T00:07:35+5:302014-11-29T00:07:35+5:30
उरुळी देवाची येथील कचरा डेपो बंद करण्यासाठी पालिकेने उरुळी देवाची व फुरसुंगी येथील ग्रामस्थांना दिलेली मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे.

कचराप्रश्नाकडे ग्रामस्थांचीच पाठ
पुणो : उरुळी देवाची येथील कचरा डेपो बंद करण्यासाठी पालिकेने उरुळी देवाची व फुरसुंगी येथील ग्रामस्थांना दिलेली मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे महिनाभर आधीच ग्रामस्थांकडून डेपो बंद आंदोलन तीव्र करण्यासंदर्भात इशारा दिल्याने पालिका प्रशासन व पदाधिकारी धास्तावले आहेत. त्यामुळे पालिकेने गेल्या चार महिन्यांत कच:यासाठीच्या उपाययोजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शुक्रवारी पालिकेत बैठक बोलाविली होती.
या बैठकीस या दोन्ही गावांतील फक्त राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहिले, तर कॉंग्रेस, भाजपा व शिवसेनेच्या पदाधिका:यांनी मात्र दांडी मारली. त्यामुळे ही बैठक रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली. दरम्यान, ही बैठक पुन्हा बोलाविण्यात येणार असल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले. चार महिन्यांपूर्वी कचरा डेपो बंद करण्यासाठी या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यस्थी करीत हे आंदोलन मागे घेण्याची विनंती ग्रामस्थांना केली होती. त्यानुसार, ग्रामस्थांनी दिलेली मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे. मात्र, या वेळी दिलेली आश्वासने पालिकेने न पाळल्यामुळे दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी 1 डिसेंबरपासूनच आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतर प्रशासनाने तत्काळ ही आश्वासने पूर्ण करण्याचे स्पष्ट केल्यानंतर, हे आंदोलन शिवतारे यांनी मागे घेतले आहे. (प्रतिनिधी)
4कचराडेपोग्रस्त ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर राहू नये, म्हणून प्रशासनाच्या वतीने महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दोन्ही गावच्या सर्वपक्षीय पदाधिका:यांना पालिकेच्या उपाय योजनांची माहिती देण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीस महापालिकेचे सर्वपक्षीय पदाधिकारी, पालिका आयुक्त कुणाल कुमारही उपस्थित होते. मात्र, या बैठकीस राष्ट्रवादीचेच अवघे तीन पदाधिकारी उपस्थित राहिल्याने अवघ्या काही मिनिटांतच ही बैठक गुंडाळण्यात आली.