शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गिरवले जाणार उर्दू अभ्यासक्रमाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 22:00 IST

या अभ्यासक्रमाद्वारे उर्दू वाचन , उर्दू लेखन , उर्दू श्रवण , उर्दू संभाषण अशी चार कौशल्ये शिकता येणार

ठळक मुद्दे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून एक वर्षाचा उर्दू फाउंडेशन अभ्यासक्रम

पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून एक वर्षाचा उर्दू फाउंडेशन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.इयत्ता दहावी, बारावी, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. पुण्यातील अ‍ॅड. सलीम शेख यांनी विद्यापीठात उर्दू अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला. त्यास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ.सदानंद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये डॉ. अझमत दलाल, प्रा. अब्दुल बारी,उज्मा तसनीम, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे यांचा समावेश होता. या समितीने अभ्यासक्रमाची रचना ठरवली असून  त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाद्वारे उर्दू वाचन , उर्दू लेखन , उर्दू श्रवण , उर्दू संभाषण अशी चार कौशल्ये शिकता येणार आहेत. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाच्या नियमानुसार केली जाणार आहे. प्रत्येक बॅचमध्ये ३० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. सध्या हे अभ्यासक्रम हिंदी विभागांतर्गत चालवले जाणार आहेत. तसेच प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे, अशी माहिती हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद भोसले यांनी सांगितले........................उर्दू ही सुसंस्कृत आणि सभ्य भारतीय भाषा आहे. ती भारतीय सांस्कृतिक क्षेत्राचा महत्वाचा घटक आहे. भारतीय समाजाचे अधिक चांगल्या प्रकारे अवलोकन करण्यासाठी  सद्यस्थितीत ही भाषा शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उर्दू अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. -डॉ. नितीन करमळकर,कुलगुरू,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठStudentविद्यार्थी