पन्नास हजारांपेक्षाही कमी भाविक

By Admin | Updated: August 4, 2014 23:23 IST2014-08-04T23:23:25+5:302014-08-04T23:23:25+5:30

o्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दुस:या o्रावणी सोमवारी सुमारे पन्नास हजारांपेक्षाही कमी भाविक आले होते.

Less than fifty thousand devotees | पन्नास हजारांपेक्षाही कमी भाविक

पन्नास हजारांपेक्षाही कमी भाविक

भीमाशंकर :   o्रीक्षेत्र भीमाशंकर येथे  दुस:या o्रावणी सोमवारी सुमारे पन्नास हजारांपेक्षाही कमी भाविक आले होते. माळीण दुर्घटनेचा मोठा परिणाम भीमाशंकरच्या यात्रेवर दिसत आहे.  दर सोमवारी बसस्थानकार्पयत जाणारी दर्शन रांग या सोमवारी निम्मीसुद्धा नव्हती.  भीमाशंकरमध्ये दाट धुके व मुसळधार पाऊस सुरू होता. गर्दी नसल्यामुळे पोलीस यंत्रणा व देवस्थानच्या नियोजनावर ताण आला नाही. 
भीमाशंकरकडे येणा:या भाविक पर्यटकांच्या संख्येवर माळीण गावातील दुर्घटनेमुळे मोठा परिणाम झालेला दिसला. दि.3क् पासून भीमाशंकरमध्ये अजिबात गर्दी नाही. भीमाशंकरजवळील माळीणमध्ये दुर्घटना घडली, अशी बातमी सर्वत्र पसरल्यामुळे भीमशंकरकडे येणा:यांची संख्या खूपच घटली आहे. यामुळे भीमाशंकरमधील दुकानदार चिंता व्यक्त करत होते.  o्रावण महिन्यासाठी दुकानात भरून ठेवलेला माल या वर्षी खपणार की नाही, अशी चिंता अनेक दुकानदारांनी व्यक्त केली.
o्रावणी सोमवारसाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त नेमण्यात आला होता. जिल्ह्यातील  बहुतांश पोलीस माळीणकडे बंदोबस्तासाठी असल्यामुळे भीमाशंकरमध्ये बरेच बाहेर जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी व अधिकारी नेमण्यात आले होते. वाहतूककोंडी होऊ नये यासाठी  निगडाळे गावाजवळील शिवप्रसाद हॉटेलसमोरील पटांगणात एसटी गाडय़ा व मोठय़ा लक्झरी गाडय़ा थांबवण्यात आल्या होत्या व येथून मिनी बसद्वारे भाविक मंदिराकडे पाठविले जात होते.  माळीण दुर्घटनेचा परिणाम पुढील सोमवारीही दिसण्याची भिती आहे. (वार्ताहर)
 
4दर्शन रांगेत उभे राहून दर्शनासाठी वेळ लागत असल्यामुळे प्रशासनाने कळस दर्शनाची व्यवस्था केली होती. पाय:यांनी सरळ खाली जाणारे भाविक कळस दर्शन घेऊन परत वर येत होते अथवा ज्या भाविकांना दर्शन पास घेऊन दर्शन करायचे असेल त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था देवस्थान ट्रस्टने केली होती.  खेड तहसीलदार प्रशांत आवटे, देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त अॅड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, र}ाकर कोडिलकर, दत्तात्रय कौदरे हे मंदिरात थांबून यात्रेचे नियोजन करीत होते.
 
4दरम्यान, वन्यजीव विभागाच्या सहायक मुख्य वनसंरक्षक कीर्ती जमदाडे-आखाडे यांनी वन्यजीव विभागाच्या हद्दीत लावलेली पक्की दुकाने दुकानदारांनी स्वत: हून काढावीत, तसेच तात्पुरत्या स्वरूपाची दुकाने पाय:याचे कठडे मोकळे सोडून आतमध्ये लावावीत व प्लॅस्किक पिशव्या विकू नयेत, कचरा टाकू नये, अशा सूचना दुकानदारांना दिल्या. दुकानदारांनी o्रावण महिनाभर दुकाने लावण्याची विनंती त्यांच्याकडे केली. शेवटच्या पाचव्या सोमवारनंतर आम्ही आमच्या हाताने दुकाने काढून टाकू, एवढय़ा महिनाभर राहू द्या, अशी विनंती केली. 

 

Web Title: Less than fifty thousand devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.