कुष्ठरोगी रुग्णांत घट
By Admin | Updated: November 5, 2015 02:08 IST2015-11-05T02:08:45+5:302015-11-05T02:08:45+5:30
गेल्या पाच वर्षांतील कुष्ठरोग रुग्णांची संख्या वाढत असतानाच २०१४- १५ या वर्षी कुष्ठरोग रुग्ण आटोक्यात आणले आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात

कुष्ठरोगी रुग्णांत घट
पिंपरी : गेल्या पाच वर्षांतील कुष्ठरोग रुग्णांची संख्या वाढत असतानाच २०१४- १५ या वर्षी कुष्ठरोग रुग्ण आटोक्यात आणले आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात ५१,८६५ नागरिकांपैकी ४ रुग्ण आढळले आहेत. यासाठी शासनाने राष्ट्रीय शहर आरोग्य
उपक्रम ही जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
कुष्ठरोगाबद्दल वस्त्यांमधील, झोपडपट्टीतील लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. या उपक्रमासाठी नियुक्त केलेल्या आरोग्यसेविका जेव्हा घरोघरी जाऊन तपासणी करतात, तेव्हा लोक तपासणी करण्यास घाबरतात. स्वत:ला असलेल्या आजाराबद्दल सांगायला कचराई करतात. त्यामुळे या आरोग्यसेविकांना त्यांना विश्वासात घेऊन आरोग्यविषयक, कुष्ठरोगविषयक माहिती द्यावी लागते. प्राथमिक स्वरूपाची माहिती देऊन लोकांनी तपासणी करावी, यासाठी प्रोत्साहन दिले जाते. २०१०च्या सर्वेक्षणामध्ये कुष्ठरोगाचे एकूण १०५ रुग्ण
आढळून आले होते, तर २०११-१२मध्ये रुग्णांची संख्या १७८ झाली होती. २०१२-१३ साली २००, २०१३-१४ साली २५८वर वाढताना आढळते. तीच रुग्णसंख्या २०१४-१५च्या सर्वेक्षणात १४६वर आली आहे.
सध्या आॅक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणामध्ये ४ रु ग्ण आढळून आले असून, १५ ते ४५
असा हा वयोगट आहे. हे रुग्ण बांधकाम विभागामध्ये काम करणारे कामगार आहेत. (प्रतिनिधी)
कुष्ठरोगाबाबत आपल्या समाजात अनेक समज- गैरसमज आहेत. ते गैरसमज दूर झाले पाहिजेत. लोकांनी समाजाचा विचार न करता कुष्ठरोगाबाबत जागृत राहिले पाहिजे. शिवाय रोग झाल्यास मुक्तपणे त्यावर लवकरात लवकर उपचार सुरू केले पाहिजेत. शासनाच्या राष्ट्रीय शहर आरोग्य उपक्रमांतर्गत कुष्ठरोग निर्मूलनासाठी आवश्यक अशा कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे अधिकाधिक सर्वेक्षण करता येत नाही. त्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे.
- डॉ. सुनील चिद्रावार, वैद्यकीय अधिकारी
सर्वेक्षण : केंद्र शासनाचा राष्ट्रीय शहर आरोग्य उपक्रम हा सध्या पिंपरी शहरात राबविण्याचे कार्य सुरू आहे. या सर्वेक्षणासाठी महापालिकेतर्फे ५० आरोग्यसेवकांची नियुक्ती केलेली आहे. दररोज ५० ते ७० घरांची तपासणी केली जाते. तसेच लोकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन रोगनिदान करावे, यासाठी त्यांना प्रवृत्त केले जाते.