शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव तालुक्याच्या थोरांदळे गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:30 IST

थोरांदळे परिसरात बिबट्याचा वावर होता, त्याने एका मजुरावर हल्ला केल्याने पिंजरा बसवण्यात आला होता

मंचर: आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे कामगारावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. फुटाणेमळा येथे लावलेल्या पिंजऱ्यात रात्री बिबट्या जेरबंद झाला.

थोरदांळे गावातील फुटाणेमळा या ठिकाणी वनविभागांने लावलेल्या पिंजऱ्यात साधारण पाच ते सहा वर्षांचा नर जातीचा बिबट्या राञीच्या बाराच्या सुमारास जेरबंद झाला. दोन दिवसांपूर्वी या परिसरात एका कामगारांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना या परीसरात घडली होती. या घटनेची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने ताबडतोब घटनास्थळी पिंजरा लावला होता. आज मध्यरात्री नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती स्थानिक लोकांनी वनमजूर महेश टेमगिरे यांना दिली. वनमजूर महेश टेमगिरे यांनी घटनेची माहिती वनपाल प्रदिप कासारे यांना दिली. घटनेची माहिती मिळताच सदर घटनास्थळी ताबडतोब वनपाल प्रदिप कासारे, ऋषिकेश कोकणे, बिबट कृतीदल गावडेवाडी मनोज तळेकर, चारूदत्त बांबळे, कुणाल गावडे, हर्षल चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पहाटे अडीचच्या सुमारास ताब्यात घेतले. सदर घटनास्थळी थोरदांळे गावचे उपसरपंच संदिप टेमगिरे तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहून वनविभागाला मदत केली. वनविभागाने हल्ला करणारा बिबट्याला जेरबंद केल्याने वनविभागाचे आभार मानले.

थोरांदळे परिसरात बिबट्याचा वावर होता. या संदर्भात नागरिकांमध्ये वेळोवेळी जनजागृती केली. यंत्राच्या साह्याने आवाज काढून बिबट्या येथे येऊ नये याची काळजी घेण्यात आली. मात्र असे असतानाही एका मजुरावर बिबट्याने हल्ला केल्याने पिंजरा बसवण्यात आला होता. या पिंजऱ्यात हल्ला केलेला बिबट्या जेरबंद झाला असून त्याची रवानगी माणिक डोह निवारा केंद्रात केली जाणार आहे. -  विकास भोसले, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी

टॅग्स :Puneपुणेambegaonआंबेगावleopardबिबट्याforest departmentवनविभागNatureनिसर्गenvironmentपर्यावरण