शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
4
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
5
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
6
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
7
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
8
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
9
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
10
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
11
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
12
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
13
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
14
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
15
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
16
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
17
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
18
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
19
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
20
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर

जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम; ओतूर-चिल्हेवाडी रस्त्याला तिघांवर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 11:19 IST

परिसरात पिंजरे लावून गस्त वाढवावी, शाळा-विद्यार्थी आणि शेतकरी वर्गाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी

ओतूर: जुन्नर तालुक्यातील ओतूर-चिल्हेवाडी रस्त्याला शुक्रवारी (दि. ४ ऑक्टोबर) रात्री पावणे आठच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. या रस्त्यावरून दोन मोटरसायकलीवर प्रवास करणाऱ्या तिघा व्यक्तींवर एका मादी बिबट्याने हल्ला केल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.     मिळालेल्या माहितीनुसार, ओतूर-चिल्हेवाडी रस्त्यावरील शेटेवाडी पाटाजवळील परिसरात ही घटना घडली. त्या ठिकाणी एका मादी बिबट्याने आपल्या दोन बछड्यांसह वास्तव्य केले असल्याचे स्थानिक सांगतात. रात्रीच्या वेळी मोटरसायकलने जात असताना या मादीने अचानक झडप घालत हल्ला केला. पहिल्या मोटरसायकलवरील डालचंद्र लेखराज सिंग (वय ४०, रा. ओतूर) हे जखमी झाले, तर दुसऱ्या मोटरसायकलवरील लक्ष्मण बबन गोंदे (वय ३७, रा. गोंदेवाडी) आणि ईश्वर रामदास जाधव (वय ४३, रा. अहिनवेवाडी, ता. जुन्नर) हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.

 स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमींना मदत करून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले या घटनेनंतर जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात वनविभागाने तत्परतेने येऊन यावेळी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील दवाखान्यात हलविण्यात आले. सुदैवाने तिघांचीही प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.

स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे मोठे वास्तव्य असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः शेटेवाडी परिसरात बिबट व त्याचे बछडे वारंवार दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे तात्काळ सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

त्याचबरोबर परिसरात पिंजरे लावून गस्त वाढवावी, तसेच शाळा-विद्यार्थी आणि शेतकरी वर्गाच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे. संपूर्ण घटनेमुळे ओतूर व परिसरात भीतीचे सावट पसरले असून ग्रामस्थ आता वनविभागाच्या तत्काळ कारवाईची प्रतीक्षा करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard terror continues in Junnar; three attacked on Otur-Chilhewadi road.

Web Summary : A female leopard attacked three people on the Otur-Chilhewadi road in Junnar, causing injuries. Locals request increased patrols and cages due to fear.
टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरleopardबिबट्याforest departmentवनविभागhospitalहॉस्पिटलNatureनिसर्ग