शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम; रोहोकडी, पिंपळगाव जोगा येथे बिबट हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 18:28 IST

अचानक पहाटे ४:४५ वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून त्यांना किरकोळ जखमी केले.

ओतूर : जुन्नर तालुक्यात रविवारी (दि. २) पिंपळगाव जोगा येथील सुनील बबन निमसे, वय ४२ वर्ष हे घराबाहेर असलेल्या शेडमध्ये झोपले असताना, अचानक पहाटे ४:४५ वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून त्यांना किरकोळ जखमी केले.

रोहोकडी येथील अभय विलास घोलप वय १९ व चुलते रखमा सखाराम घोलप वय ६१ यांच्यावर विद्युत पंप चालू करण्यासाठी मोटारसायकलवरून जात असता, सकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. जखमी व्यक्तींना तत्काळ ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार घेऊन पुढील उपचारासाठी मंचर येथील ग्रामीण रुग्णालय नेण्यात आले.ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी तत्काळ वनविभागाचे पथक दाखल होऊन पिंपळगाव जोगा वनपाल मनीषा काळे, वनरक्षक रेखा धूम, आंबेगव्हाण वनपाल रूपावली जगताप, वनरक्षक वैभव वाजे, किशन खरोडे वनरक्षक व्ही.ए.बेले, फुलचंद खंडागळे, ऋषिकेश गायकवाड, फिरोज पठाण रेस्क्यू टीम यांनी हल्ला झालेल्या ठिकाणी पाहणी करून तत्काळ पिंजरा लावण्यात येईल, असे सांगितले, तसेच रेस्क्यू टीम यांनी बिबट वन्य प्राण्याबद्दल बिबट प्रवण क्षेत्रातील नागरिकांना माहिती देऊन स्वसंरक्षणार्थ उपाययोजना सांगून जनजागृती करीत आहेत, तरी वनविभागाकडून असे आवाहन करण्यात येते की, पहाटे उघड्यावर शौचास जाऊ नये, तसेच रात्री उघड्यावर झोपू नये व बिबट प्रवण क्षेत्रातून वाहनाद्वारे जात असताना वाहनाचे हॉर्न मोठ्याने वाजविणे, जेणेकरून रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेले वन्य प्राणी त्याची जागा बदलतील, असे वनविभागाकडून सूचित करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडleopardबिबट्याforestजंगल