धष्टपुष्ट बिबट्या पिंजऱ्यात अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 16:50 IST2018-07-10T16:49:36+5:302018-07-10T16:50:05+5:30
घोडेगावला लागून असलेल्या पसारेवस्तीत बिबटया पिंजऱ्यात जेरबंद झाला. विशेष म्हणजे जुन्नर वनविभागाअंतर्गत आतापर्यंत पकडलेल्या बिबट्यात हा सर्वात धष्टपुष्ट बिबट्या असल्याचे वनविभागने सांगितले.

धष्टपुष्ट बिबट्या पिंजऱ्यात अडकला
घोडेगाव : घोडेगावला लागून असलेल्या पसारेवस्तीत बिबटया पिंजऱ्यात जेरबंद झाला. विशेष म्हणजे जुन्नर वनविभागाअंतर्गत आतापर्यंत पकडलेल्या बिबट्यात हा सर्वात धष्टपुष्ट बिबट्या असल्याचे वनविभागने सांगितले.
गेली अनेक दिवांसपासून घोडेगाव जवळील परांडा, गोनवडी, कोलदरा, आमोंडी, शिंदेवाडी, धोंडमाळ या परिसरात बिबटया फिरत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात होते. त्याने अनेक शेळी, वासरे, कुत्री मारली होती. परांडा, शिंदेवाडी येथे या बिबटयाला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले होते. मात्र तो अडकला नाही. मात्र दरेकरवाडी रोडला लागून असलेल्या पसारेवस्तीत लावण्यात आलेल्या पिंज-यात हा बिबटया अडकला. पसारेवस्तीत डॉ.अतुल चिखले यांच्या घराबाहेर अंगणात (दि.८) रोजी रात्री बिबटया सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला होता. त्यांचे कुत्र मारलं होतं. याची खबर वनक्षेत्रपाल वाय.एस.महाजन यांना दिली होती. त्यानंतर तातडीने शेतात पिंजरा लावला, त्यामध्ये दोन शेळया ठेवल्या. पिंजरा लावताच लगेलच दुसऱ्या रात्री म्हणजे सोमवारी रात्री (दि.९) रोजी हा बिबटया पिंजऱ्यात अडकला. आज (दि.१०) रोजी सकाळी डॉ.चिखले यांना पिंजºयात आवाज येवू लागला म्हणून त्यांनी पाहिले असता आत बिबटया दिसला.
तातडीने त्यांनी वनक्षेत्रपाल वाय.एस.महाजन यांना कळविले. तोपर्यंत घोडेगाव मध्ये वा-या सारखी बातमी बसली. गावातील लोक मोठया संख्येने बिबटया पहाण्यासाठी आली होते. बिबटया पिंजऱ्यात डरकाळ्या फोडत होता. सकाळी ८ वाजता हा बिबटया जुन्नर येथील माणिकडोहच्या बिबटया निवारा केंद्रात हलविण्यात आला. वनपाल बी.ए,साबळे यांनी हा पकडलेला बिबट्या हा आतापर्यंत जुन्नर वनविभागात पकडलेल्यांपैैकी सर्वात धष्टपुष्ट असल्याचे सांगितले.