Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 08:19 IST2025-12-12T08:16:52+5:302025-12-12T08:19:27+5:30
Pune Airport Leopard Rescue Operation: पुणे विमानतळ परिसरात बिबट्याचा वावर होता. गेल्या काही महिन्यांपासून हा बिबट्या अधून मधून दिसत होता. अखेर त्याला पकडण्यात यश मिळाले आहे.

Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
Pune Airport Leopard News: एप्रिलपासून पुणे विमानतळ परिसरात फिरणाऱ्या बिबट्याला अखेर सुरक्षितरीत्या पकडण्यात यश आले आहे. पुणे वन विभाग, RESQ चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय हवाई दल आणि पुणे विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त ऑपरेशनमुळे हे जिकिरीचे काम शक्य झाले.
पुणे विमानतळावर हा बिबट्या 28 एप्रिल 2025 रोजी प्रथमच दिसला होता. त्यानंतर अनेक महिन्यांपर्यंत तो विमानतळ परिसरातील बोगदे, दाट झाडी आणि कमी रहदारी असलेल्या परिसरात वावरत होता. या ठिकाणी भारतीय हवाई दलाची ठिकाणी असल्यामुळे आणि विस्तीर्ण भाग असल्यामुळे या बिबट्याला जेरबंद करणे आव्हानात्मक ठरत होते.

कॅमेरा ट्रॅप, लाईव्ह कॅमेरे आणि पिंजरे लावून या बिबट्यावर नजर ठेवली जात होती. मात्र एकदाही हा बिबट्या पिंजऱ्यात शिरला नव्हता..पकडल्यानंतर बिबट्याला आरोग्य तपासणीसाठी बावधन येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून सध्या तो पूर्णपणे सुरक्षित आणि स्थिर असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.