शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजगड, तोरणा किल्ल्याच्या परिसरात बिबट्याचा वावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 19:54 IST

तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगला जाताना सावधान, बिबट्याचा मुक्तसंचार कॅमेरात कैद

वेल्हे : राजगड तालुक्यातील गुंजविणे येथील पांडुरंग बबन कचरे या शेतकऱ्यांच्या दोन वर्षांच्या बैलावर बिबट्याने हल्ला केल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. राजगड व तोरणा किल्ल्याच्या परिसरात बिबट्याच्या वावरामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तोरणा किल्ल्यावर गेल्या तीन दिवसांपसून बिबट्या ठाण मांडून बसला असल्याची घटना ताजी असतानाच आज राजगड पायथ्याशी गुंजवणी गावातील सायंकाळी सहाच्या सुमारास सर्व जनावरे रानातून परत घरी येत असताना अचानक येथील पांडुरंग बबन कचरे या शेतकऱ्याच्या दोन वर्षांच्या बैलावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात या बैलाचा मृत्यू झाला आहे. वनविभागाला माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. येथील घटनेचा पंचनामा केला असून, नुकसानभरपाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले असल्याची माहिती वनपाल मनोज तारू यांनी दिली.गेल्या महिन्याभरापासून या परिसरात बिबट्या फिरत असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली, तर मागील पंधरा दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याचे वासरू घराशेजारून बिबट्या घेऊन गेला होता. तोरणा किल्ल्यावर गेलेल्या बिबट्या अद्यापही किल्ल्यावरच आहे, तर दुसरीकडे राजगड किल्ल्याच्या पायथ्याला दुसऱ्या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. राजगड व तोरणा हे दोन्ही किल्ले शेजारी-शेजारी असल्याने या परिसरात असलेल्या बिबट्यामुळे येथील शेतकरी पर्यटक यांना धोका निर्माण झालेला आहे. वनविभागाने या बिबट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थ व येणारे पर्यटक करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडleopardबिबट्याFortगड