शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकच्या पिशवीत गुदमरल्याने बिबट्याचा गेला जीव; नारायणगाव परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 15:35 IST

कठडे नसलेल्या विहिरीत होता पडला.....

ठळक मुद्देश्वास घेता न आल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट

पुणे : एका प्लास्टिकच्या गोणीमुळे बिबट्याचा जीव गेल्याची घटना नारायणगाव परिसरात बुधवारी घडली आहे. पाण्याच्या शोधात बिबट्या फिरताना संरक्षक कठडे नसल्याने विहिरत पडला आणि त्यात एक मोठी प्लास्टिकची गोणी (खताची) होती. जीव वाचवण्यासाठी बिबट्या पिशवीत गेला आणि त्यातच अडकला. त्यात बिबट्याचा गुुुदमरून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. 

नारायणगाव परिसरातील धनगरवाडीतील एका संरक्षक कठडे नसलेल्या विहिरीत बिबट्या मादी पडली होती. विहिरीत पडल्यानंतर ती जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा तिथे मोठी प्लास्टिकची गोणी दिसली. त्या पिशवीत ती बिबट मादी गेली. त्यानंतर कदाचित आतमध्ये तिला श्वास घेता आल नाही. श्वास घेण्याच्या प्रयत्नात पाण्यात पडून पिशवीत पाणी जाऊन तिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ग्रामस्थ रमेश शेळके यांनी विहिरीवर गेले तेव्हा त्यांना हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली. वन अधिकारी तिथे आले आणि त्यांंनी पिशवीसह बिबट मादीला विहिरी बाहेर काढले. त्यानंतर शवविच्छेदन अहवालात त्या बिबट मादीचा गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याचे समजले. त्यामुळे पिशवीमुळे एका बिबट मादीचा जीव घेतल्याने लोकांमध्ये तीव्र संताप आहे. ----------------------------------------

विहिरींना संरक्षक कठडे बांधावेत 

उन्हाळा असल्याने अनेक वन्यजीवांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ग्रामीण भागातील अनेक विहिरींना संरक्षक कठडे नाहीत. परिणामी वन्यजीव त्यात पडू जखमी होतात किंवा त्यांचा जीवही जातो. म्हणून विहिरींना कठडे लावणे आवश्यक असून, वन विभागानेही पाणलठ्यांची सोय करायला हवी, अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून होत आहे. -----------------खताला वापरतात ती गोणी विहिरीत पडलेली होती. त्यात बिबट गेली असणार आणि त्यात गेल्यावर श्वास घेण्यासाठी झटापट करावी लागली असेल. त्यातच गोणीत पाणी शिरून बिबटला श्वास घेता आला नसेल. परिणामी तिचा गोणीतच मृत्यू झाला. - मनीषा काळे, वनपाल, नारायणगाव --------------------

टॅग्स :narayangaonनारायणगावleopardबिबट्याDeathमृत्यूforest departmentवनविभागPuneपुणे