प्लास्टिकच्या पिशवीत गुदमरल्याने बिबट्याचा गेला जीव; नारायणगाव परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 03:25 PM2021-04-29T15:25:21+5:302021-04-29T15:35:58+5:30

कठडे नसलेल्या विहिरीत होता पडला.....

The leopard died after suffocating in a plastic bag; Incidents in Narayangaon area | प्लास्टिकच्या पिशवीत गुदमरल्याने बिबट्याचा गेला जीव; नारायणगाव परिसरातील घटना

प्लास्टिकच्या पिशवीत गुदमरल्याने बिबट्याचा गेला जीव; नारायणगाव परिसरातील घटना

googlenewsNext
ठळक मुद्देश्वास घेता न आल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट

पुणे : एका प्लास्टिकच्या गोणीमुळे बिबट्याचा जीव गेल्याची घटना नारायणगाव परिसरात बुधवारी घडली आहे. पाण्याच्या शोधात बिबट्या फिरताना संरक्षक कठडे नसल्याने विहिरत पडला आणि त्यात एक मोठी प्लास्टिकची गोणी (खताची) होती. जीव वाचवण्यासाठी बिबट्या पिशवीत गेला आणि त्यातच अडकला. त्यात बिबट्याचा गुुुदमरून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. 

नारायणगाव परिसरातील धनगरवाडीतील एका संरक्षक कठडे नसलेल्या विहिरीत बिबट्या मादी पडली होती. विहिरीत पडल्यानंतर ती जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा तिथे मोठी प्लास्टिकची गोणी दिसली. त्या पिशवीत ती बिबट मादी गेली. त्यानंतर कदाचित आतमध्ये तिला श्वास घेता आल नाही. श्वास घेण्याच्या प्रयत्नात पाण्यात पडून पिशवीत पाणी जाऊन तिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ग्रामस्थ रमेश शेळके यांनी विहिरीवर गेले तेव्हा त्यांना हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली. वन अधिकारी तिथे आले आणि त्यांंनी पिशवीसह बिबट मादीला विहिरी बाहेर काढले. त्यानंतर शवविच्छेदन अहवालात त्या बिबट मादीचा गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याचे समजले. त्यामुळे पिशवीमुळे एका बिबट मादीचा जीव घेतल्याने लोकांमध्ये तीव्र संताप आहे. 
----------------------------------------


विहिरींना संरक्षक कठडे बांधावेत 

उन्हाळा असल्याने अनेक वन्यजीवांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ग्रामीण भागातील अनेक विहिरींना संरक्षक कठडे नाहीत. परिणामी वन्यजीव त्यात पडू जखमी होतात किंवा त्यांचा जीवही जातो. म्हणून विहिरींना कठडे लावणे आवश्यक असून, वन विभागानेही पाणलठ्यांची सोय करायला हवी, अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून होत आहे. 
-----------------
खताला वापरतात ती गोणी विहिरीत पडलेली होती. त्यात बिबट गेली असणार आणि त्यात गेल्यावर श्वास घेण्यासाठी झटापट करावी लागली असेल. त्यातच गोणीत पाणी शिरून बिबटला श्वास घेता आला नसेल. परिणामी तिचा गोणीतच मृत्यू झाला. 
- मनीषा काळे, वनपाल, नारायणगाव 
--------------------

Web Title: The leopard died after suffocating in a plastic bag; Incidents in Narayangaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.