Pune: उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले, ऊसतोडणी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 03:25 PM2024-03-19T15:25:59+5:302024-03-19T15:27:35+5:30

पिल्ले आढळून आल्यामुळे ऊसतोडणी कामगारांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे...

Leopard cubs found in sugarcane fields, panic among sugarcane workers | Pune: उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले, ऊसतोडणी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

Pune: उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले, ऊसतोडणी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

मांडवगण फराटा (पुणे) : इनामगाव ( ता. शिरूर ) येथे ऊसतोडणी चालू असताना ऊसतोडणी मजुरांना बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. येथील शेतकरी मधुकर मचाले यांच्या शेतात ऊसतोडणी चालू असताना पिल्ले आढळून आल्यामुळे ऊसतोडणी कामगारांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

मागच्याच आठवड्यात मांडवगण फराटा, शिरसगाव काटा शिवेवरील वस्तीनजीक उसाच्या शेतात शेतकऱ्यांना चार बिबटे दिसून आले होते. या बिबट्यांनी संकरित गायींच्या दोन वासरांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला होता. सतत बिबटे आढळत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. रात्री अपरात्री घराबाहेर पडणे धोकादायक बनले आहे. पिंजरे लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Leopard cubs found in sugarcane fields, panic among sugarcane workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.