शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

कांदळी येथे बिबट्याची मादी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 02:31 IST

कांदळी येथे लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी पहाटे ३ च्या सुमारास बिबट्याची मादी जेरबंद झाली. या मादीला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे यांनी दिली.

खोडद - कांदळी येथे लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी पहाटे ३ च्या सुमारास बिबट्याची मादी जेरबंद झाली. या मादीला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे यांनी दिली. दरम्यान, नागरिकांनी पशुधनाची व आपली स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील येळे यांनी केले आहे.कांदळी येथील शेतकरी किरण सावळेराम घाडगे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात ही ३ वर्षे वयाची बिबट्याची मादी जेरबंद झाली. वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे, वनपाल एस. आर. खट्टे, नियतक्षेत्र वनअधिकारी आकाश तंगडवार, नाथा भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदळी येथे पिंजरा लावण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून कांदळी परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. बिबट्यांकडून शेळ्या, मेंढ्या, कालवडी आणि कोंबड्यांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. कांदळी परिसरात बिबट्या जेरबंद करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी वडामाथा येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले होते. कांदळी, वैशाखेड परिसरात आणखी बिबटे असावेत, अशी शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. येथील परिसरात पिंजरा लावून राहिलेल्या बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी राहुल घाडगे, गोरक्षनाथ घाडगे, शिवाजी घाडगे, सुजित गुंजाळ, श्रीकांत घाडगे, प्रफुल रेपाळे, विशाल रेपाळे, सुनील गुंजाळ, संजय घाडगे, मयूर घाडगे, जालिंदर घाडगे यांनी केली आहे.या परिसरातील शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात पाणी भरावे लागते. या परिसरात बिबट्याचावावर वाढल्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायलादेखील धजावत नाही. यामुळे शेतीवर परिणाम झाला आहे.आपल्या तालुक्यात ऊसशेतीचे प्रमाण अधिक आहे. बिबट्यांसाठी मुख्य लपन म्हणजे ऊस आहे. बिबट्यांना व त्यांच्या पिलांना उसात सुरक्षित निवारा, गारवा, पिण्यासाठी पाणी, ससे, उंदीर यांसारखे आदी भक्ष्य हे अगदी सहज उसातच उपलब्ध होते. यामुळे उसात बिबट्यांचे वास्तव्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जुन्नर तालुक्यात ऊसतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऊसतोडणीमुळे सध्या बिबट्यांची लपन कमी होत आहे. पाणी आणि भक्ष्याच्या शोधात बिबटे आता मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत. नागरिकांनी आपले पशुधन आणि स्वत:ची काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, कालवडी व आदी जनावरे बंदिस्त गोठ्यांमध्ये सुरक्षित ठेवावीत. तसेच शेतकºयांनी रात्रीच्या वेळी शेतात काम करताना हातात काठी आणि सोबतीला एक-दोन जण घेऊन जावे. बिबट्या दिसल्यास घाबरून जाऊ नये किंवा त्याच्यासमोर खाली वाकण्याचा किंवा बसण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी बिबट्या हल्ला करण्याचा धोका अधिक असतो.- बी. सी. येळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, ओतूरपाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्लानिरगुडसर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागापूर (रिठेमळा) येथे रविवारी पहाटे दोनच्या सुमारास मनेश भगवंत रिठे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून बिबट्याने ठार केले.तालुक्याच्या पूर्व भागात सततच्या होणाºया हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. रात्री दिसणारा बिबट्या आता दिवसाही दिसू लागल्याने शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाही. त्याचा परिणाम शेतीकामावर झाला आहे. वनखात्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्याच्या वावरामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली असून मागील आठवड्यात पोंदेवाडी येथे बिबट्याने हल्ला करून एका युवकाला जखमी केले होते. तसेच नागापूर या ठिकाणी एका बिबट्याच्या बछड्याला पकडून पुन्हा त्याच्या आईच्या हवाली करण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी पोंदेवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभगाला यश आले होते. दररोज पूर्व भागात कुठेना कुठे हल्ला झाल्याची घटना घडत आहेत.त्यामुळे नागापूर, पोंदेवाडीमधील नागरिक बिबट्याच्या वावरामुळे दहशतीखाली आहेत. वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागापूरचे उपसरपंच सनील शिंदे व पोंदेवाडीचे सरपंच अनिल वाळुंज यांनी केली आहे. परिसरात उसाचे मोठे क्षेत्र असल्याने या ठिकाणी बिबट्याचा कायम वावर असतो. या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे.उसाचे क्षेत्र तसेच एका बाजूला असणारे जंगल, डोंगर यामुळे पाळीव प्राण्यांना या ठिकाणी वास्तव्याला पोषक वातावरण आहे. सध्यानागापूर व पोंदेवाडीत दिसणाºया बिबट्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणे