शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दबा धरून माणसांवर हल्ला करणारा बिबट्याच नरभक्षक: माजी वन अधिकारी प्रभाकर कुकडोलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 16:10 IST

गेल्या काही दिवसांपासून करमाळा धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे दोनशेहून अधिक लोकं दिवस-रात्र कार्यरत आहेत.

ठळक मुद्देवन्यजीव धोरण आखण्याची गरज

पुणे : बिबट्या करमाळ्यात (जि. सोलापूर) धुमाकूळ घालत आला आहे. आता तो माळरानात गेल्याने तिथे त्याची दहशत पसरलेली आहे. बिबट्याने अनेकांचा बळी घेतल्याने त्याला नरभक्षक म्हटले जात आहे. पण तो हल्ला दबा धरून करतो की, घाबरून करतो? माणसांवरच हल्ला करतोय का ? जर तो असेच करतो? असेल, तरच तो नरभक्षक समजावा. त्यामुळे बिबट्यांचे निरीक्षण, नोंदी आणि मग निष्कर्ष काढणे गरजेचे आहे, अशी माहिती माजी वन अधिकारी व वन्यजीव अभ्यासक प्रभाकर कुकडोलकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

गेल्या काही दिवसांपासून करमाळा बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे दोनशेहून अधिक लोकं दिवस-रात्र कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत चाळीस ट्रॅप कॅमेरे, पंधरा पिंजरे,  शार्पशूटर,  शस्त्रधारी पोलीस, श्वान पथक असे सर्व साहित्य असूनही बिबट्या हाती लागत नाही. कारण तिथे उसाचे शेत आणि केळीचे बागा आहेत. त्यात तो शोधता येत नाही.  कुकडोलकर म्हणाले, ‘‘वन विभागाने आता बिबट्यांच्या आणि एकूण वन्यजीवांबाबत धोरण ठरवावे. बिबट्या आपला अधिवास सोडून इतरत्र फिरतो आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर भाग हा बिबट्यांचे प्रजोत्पदनाचे केंद्रच बनले आहे. त्यामुळे तिथून बिबटे इतर ठिकाणी जात आहेत. सोलापूर, मराठवाड्यात बिबटे नव्हते. आता तिकडेही ते जात आहेत. कारण तिकडे ऊसाची शेती खूप आहे. त्यांचे राहण्याचे ठिकाणच ऊस झाले आहे. ऊसामध्येच ते वाढत आहेत.’’ 

वन विभागाने उसाच्या क्षेत्राची ठेवावी नोंदएखादा बिबट्या लोकांवर हल्ला करत असेल, तर तो भीतीपोटी करत असू शकतो. त्यामुळे बिबट्याबाबत सखोल निरीक्षण, नोंदी आणि त्यानंतर निष्कर्ष काढून अहवाल केला पाहिजे. त्यानंतर धेारण आखावे. उसाचे क्षेत्र नेमके कुठे आणि किती आहे ? याची नोंद वन विभागाने ठेवावी. तिथून मग बिबट्यांचे स्थलांतर पुन्हा त्यांच्या अधिवासात कसे होईल, यावर भर हवा.  

...तर बिबट्याला गोळ्या घाला ! बिबट्यांचे अधिवास शोधून ते घोषित करावेत. त्या अधिवासाच्या बाहेर जर बिबट्या दिसला, तर त्याला गोळ्या घालाव्यात. पण, यासाठी अगोदर वन्यजीव धोरण हवे. त्यांचा अधिवास संरक्षित हवा, त्यांना खाद्य मिळायला हवे. तरच हा वन्यजीव संघर्ष कमी होऊ शकतो, असे कुकडोलकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याFarmerशेतकरीDeathमृत्यूforest departmentवनविभाग