बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:10 IST2021-02-05T05:10:31+5:302021-02-05T05:10:31+5:30
गटकळ मळा व परिसरातील शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याने शेतकरीवर्गाची पाळीव जनावरे फस्त करण्याचा ...

बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
गटकळ मळा व परिसरातील शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याने शेतकरीवर्गाची पाळीव जनावरे फस्त करण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरणात पसरले आहे.
येथील शेतकरी महेश ज्ञानदेव कणसे यांच्या शेतात वनखात्याने पिंजरा लावला होता. आज पहाटेच्या सुमारास या पिंजऱ्यात नर जातीचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. या बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात पाठविण्यात आले असल्याचे वनपाल एस. के. साळुंखे, वनरक्षक जे. बी. सानप यांनी दिली. तसेच या परिसरात अजूनही काही बिबटे लोकांना दिसत असून या भागात पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
--
फोटो २७ बेल्हा बिबट्या
फोटो ओळी : राजुरी (ता. जुन्नर) येथील गटकळ मळा शिवारात पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या दिसत आहे.