शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
3
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
4
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
5
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
6
'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."
7
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
8
'मुरांबा'मध्ये एन्ट्री केलेल्या 'या' चिमुकलीने हिंदीतही केलंय काम, ओळखलंत का?
9
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
10
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
11
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
12
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
13
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
14
पोलिस मारहाण प्रकरणातून गोपाळ शेट्टी यांची मुक्तता; ठोस, विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव : न्यायालय
15
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
16
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
17
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
18
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
19
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
20
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश

दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला; पत्नीने हातातील बॅग बिबट्याच्या तोंडावर मारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 17:35 IST

पत्नीने बिबटयाच्या तोंडावर बॅग मारली त्याचवेळी मागून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची लाईट चमकल्याने तो पळून गेला

मंचर: वर्षश्राद्ध कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीवर व मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री चांडोली गावच्या हद्दीत घडली आहे. या घटनेत भरत गोविंद राऊत हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महिलेने प्रसंगावधान राखत हातातील बॅग बिबट्याच्या तोंडावर फेकून मारली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सातगाव पठार भागातील पेठ येथून चांडोली खुर्द येथे चुलत भावाच्या वडिलांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमाला दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान घडली आहे. या घटनेत भरत गोविंद राऊत (रा. पेठ) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचार सुरू आहेत. मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस व वनपाल शशिकांत मडके यांनी भेट दिली.

भरत गोविंद राऊत (वय ५३), पत्नी रचना भरत राऊत (वय ४३) व मुलगा समर्थ भरत राऊत (वय ११), हे भाऊबीजेचा कार्यक्रम उरकून रात्री ९ वाजता पेठ येथुन चांडोली येथे चुलत भाऊ राहुल रेवजी राऊत यांच्या घरी चुलत्याच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमाला निघाले होते. रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान ते चांडोली खुर्द फाटा येथे  रस्त्याने जात असताना रस्त्याच्या बाजूकडे उसातून अचानक बिबट्याने डरकाळी फोडत त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी बिबट्याने भरत राऊत यांच्या पायावर पंजा मारल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांनी प्रसंगवधान दाखवत दुचाकी पळवली. परंतु काही वेळ बिबट्याने त्यांचा पाठलाग केला त्यांची पत्नी रचना राऊत दुचाकीच्या मागे बसली होती. तिने प्रसंगावधान दाखवत हातातील बॅग बिबट्याच्या तोंडावर फेकून मारली. त्यामुळे बिबट्या दबकला मात्र तो त्यांचा हळूहळू पाठलाग करत होता. त्याचवेळी रस्त्यावरून मागून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची लाईट चमकल्याने बिबट्या पळून गेला आहे.

भरत राऊत यांनी दुचाकी पळवत पुढे येऊन थांबवली. त्यावेळी त्यांच्या पायातून रक्त पडत होते. त्यांनी त्यांचा भाऊ राहुल राऊत याला फोन करून घटनेची माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी येत भरत राऊत यांना उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. रुग्णालय प्रशासनाने याबाबत वनविभागाचे अधिकारी यांना कळवळे आहे. दरम्यान भरत राऊत हे कुटुंबातील कमावती व्यक्ती असून वनविभागाचे अधिकारी यांनी योग्य तो पाठपुरावा करून त्यांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी  कुटुंबियांनी केली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :PuneपुणेMancharमंचरleopardबिबट्याAccidentअपघातhusband and wifeपती- जोडीदारforest departmentवनविभाग