नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथे बुधवारी (दि. २४ सप्टेंबर) रात्री एका सात वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. सिद्धार्थ प्रवीण केदार असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ घराच्या बाहेर बसून अभ्यास करत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घेतली आणि त्याला उचलून घेऊन गेला. आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला, परंतु बिबट्या सिद्धार्थला घेऊन पसार झाला. ग्रामस्थांनी तातडीने शोधकार्य सुरू केले असता, जवळच्या शेतात सिद्धार्थचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/782217644406454/}}}}
घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतप्त ग्रामस्थांनी मुलाचा मृतदेह वनविभागाच्या ताब्यात देण्यास नकार देत निषेध व्यक्त केला. बिबट्याच्या हल्ल्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी लेखी हमी देण्याची मागणी करत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. या घटनेने कुमशेत परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Web Summary : A seven-year-old boy was killed in a leopard attack while studying outside his home in Kumshat, Junnar. Villagers are outraged, demanding action from the forest department. The leopard snatched the boy, and his body was later found in a nearby field. Tensions are high in the area.
Web Summary : जुनार के कुमशेत में घर के बाहर पढ़ाई करते समय तेंदुए ने सात साल के बच्चे पर हमला कर दिया, जिससे उसकी मौत हो गई। ग्रामीणों में आक्रोश है और वन विभाग से कार्रवाई की मांग की जा रही है। तेंदुए ने बच्चे को छीन लिया, और बाद में उसका शव पास के खेत में मिला। इलाके में तनाव है।