जिल्हा परिषद सभापतिपदासाठी विधानसभेचेच गणित
By Admin | Updated: October 2, 2014 23:22 IST2014-10-02T23:22:31+5:302014-10-02T23:22:31+5:30
विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा स्वबळावर रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेचे गणित लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या सभापतिपदावर इच्छुकांची वर्णी लावली आहे.

जिल्हा परिषद सभापतिपदासाठी विधानसभेचेच गणित
>पुणो : विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा स्वबळावर रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेचे गणित लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या सभापतिपदावर इच्छुकांची वर्णी लावली आहे. बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदी मंगलदास बांदल, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतीपदी सारिका इंगळे, महिला व बालकल्याण सभापतीपदी वंदना धुमाळ, समाजकल्याण सभापतीपदी आतिष परदेशी यांची बिनविरोध निवड शुक्रवारी झाली.
जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या विशेष सभेमध्ये ही निवड करण्यात आली. सभापतिपदाच्या 4 पदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 जण, शिवसेनेचे 3, व इतर 1 अशा 8 जणांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारी घेण्याच्या वेळेमध्ये विरोधी पक्षाच्या चौघांनी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौघांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी स्नेहल बर्गे यांनी जाहीर केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीमध्ये आंबेगाव मतदारसंघातून मंगलदास बांदल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरही त्यांना जोरदार दावा सांगितला होता. आंबेगाव आणि शिरूरचे गणित लक्षात घेऊन त्यांना बांधकाम व आरोग्य समितीचे सभापतिपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
भोर मतदारसंघामध्ये 2क्क्4 व 2क्क्9 मध्ये बंडखोरी करून मानसिंग धुमाळ यांनी निवडणूक लढविली होती. यंदा त्यांच्या पत्नी वंदना धुमाळ यांची महिला व बालकल्याण समिती सभापती वर्णी लावण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाच्या मागे ताकद उभी करावी याकरिता ही निवड करण्यात आली. पुरंदरमधील सारिका इंगळे कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती आहेत. त्यांचे वडील सुदाम इंगळे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य आहेत. (प्रतिनिधी)
भोर मतदारसंघाचे गणित सांभाळताना मुळशी तालुक्यातील नाराजीचा सामना राष्ट्रवादीला करावा लागणार आहे. मुळशीमधील शांताराम इंगवले यंदा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदासाठी इच्छुक होते. किमान बांधकाम समिती तरी दिली जाईल अशी अपेक्षा होती; मात्र त्यांना यंदा संधी मिळाली नाही. त्यामुळे नाराजी आहे.