शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

सैनिकांच्या गोलेगावात लोकवर्गणीतून शहीद स्मारक! घरातील किमान एक व्यक्ती सैन्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 00:47 IST

ज्या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती सैन्यात आहे, त्या गोलेगावात लोकवर्गणी तसेच देणग्यांतून शहीद स्मारक उभे राहात आहे. या स्मारकाचे ९० टक्के काम पूर्णत्वास आले आहे.

शिरूर - ज्या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती सैन्यात आहे, त्या गोलेगावात लोकवर्गणी तसेच देणग्यांतून शहीद स्मारक उभे राहात आहे. या स्मारकाचे ९० टक्के काम पूर्णत्वास आले आहे. सैन्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावाच्या स्मारकासाठी शासकीय निधी मिळाला असताना हे स्मारक केव्हाच उभे राहिले असते, हे मात्र खरे.दुसºया महायुद्धापासून ते कारगगिलच्या युद्धापर्यंत गोलेगावातील अनेक जवान देशासाठी शहीद झाले. गावातील प्रत्येक घरातील किमान एक तरी व्यक्ती सैन्यात असण्याची फार जुनी परंपरा या गोलेगावात आहे. आजमितीला या गावातील ८० तरुण सैन्यात आहेत, तर ९५ माजी सैनिक हयात आहेत.मनामनांत देशभक्ती सजल्याचे हे द्योतक म्हणावे लागेल.देशाप्रति एक अनोख्या प्रकारे प्रेमभावना जपणाºया गोलेगावात शासनाने केव्हाच शहीद स्मारक उभारणे व त्यासाठी निधी उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र २०१८ साल उजाडले तरी शासनाने या गावाकडे पाहिजे तेवढ्या गांभीर्याने लक्ष दिले नाही. या स्मारकासाठी अखेर गावकरीच पुढे आले. ग्रामपंचायतीने ठराव करून कृष्णामाई मंडळाला स्मारकासाठी जागा दिली. स्मारकासाठी ‘शहीद जवान स्मारक समिती’ची स्थापना करण्यात आली. लोकवर्गणी तसेच देणग्यांतून स्मारकाच्या उभारणीस सुरुवात करण्यात आली. या स्मारकाचे ९० टक्के काम पूर्णत्वास आले आहे. अद्यापही थोडे काम बाकी आहे. मात्र ज्या गावातील नऊ जवान शहीद झाले, त्या गावात शहिदांचे स्मारक उभे राहण्यास एवढा कालावधी लागायला नको होता, अशीच गावकºयांची भावना असेल. स्मारक उभे राहिले याचे गावातील आजी- माजी सैनिकांना समाधान असावे.दुसºया महायुद्धात गोलेगावातील भागुजी बाळाजी वाखारे, श्रीपती विनोबा भोगावडे, बापू शंकर वाखारे, किसन शंकर वाखारे, बापू मारुती भोगावडे, चिमाजी गणपत इसवे हे जवान शहीद झाले.जयराम नारायण महाजन (१९६२ चे युद्ध), सोपान बळवंत वाखारे (१९७१ चे युद्ध),बाळासाहेब धोंडिबा गायकवाड (२००० चे कारगिल युद्ध) हे जवानही शहीद झाले आहेत.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या