शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

दरडी कोसळण्यापूर्वीच लक्षणे जाणून घ्या

By admin | Updated: August 14, 2015 03:13 IST

दरडी अचानक कोसळत नाहीत़ त्या कोसळण्यापूर्वी तेथील डोंगरउतार अस्थिर झाल्याची लक्षणे निसर्ग दाखवून देत असतो़ मानवी अतिक्रमणामुळे डोंगरउतार असमतोल निर्माण करणारी

डिंभे : दरडी अचानक कोसळत नाहीत़ त्या कोसळण्यापूर्वी तेथील डोंगरउतार अस्थिर झाल्याची लक्षणे निसर्ग दाखवून देत असतो़ मानवी अतिक्रमणामुळे डोंगरउतार असमतोल निर्माण करणारी क्रिया झाली की दरडी कोसळणे ही निसर्गाची प्रतिक्रिया आहे, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठ भूशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सतीश ठिगळे यांनी केले़डिंभे जलाशयाच्या परिसरातील दरडग्रस्त गावांमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी आणि तरुण पिढीला दरडी का, कशा, कोठे आणि केव्हा कोसळतात तसेच दरडीची लक्षणे यासंबंधी माहिती डॉ़ ठिगळे यांनी दिली़ त्यांनी असाणे व बेंढारवाडी या गावांना भेट देवून येथील नागरीकांना मार्गदर्शन केले. तर असाणे व पोखरी येथील शाळेतील मुलांनाही भित्तीपत्रके तसेच स्लाईड शोच्या सहाय्याने दरडी कोसळून निर्माण होणा-या दुर्घटनांविषयी माहिती दिली. पर्वत रांगांचा प्रदेश, भुकंप प्रवणक्षेत्र, अतिवृष्टी व मानवीय हस्तक्षेप ही दरडी कोसळण्यामागची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द, जांभोरीची काळवाडी, पोखरीची बेंढारवाडी आदि १३ गावे संवेदनशिल गावे म्हणून समोर आली आहेत. छोट्या-मोठ्या दरडी कोसळणे म्हणजेच पुढे येणा-या मोठया धोक्याची घंटा आहे. यातील शास्त्रीय कारणे समजून घेवून भविष्यात येणारी मोठी दुर्घटना टाळण्यासाठी गावक-यांनी दरडी कोसळणा-या लक्षणांची चाहूल लागताच सावध राहाण्याचे आवाहन त्यांनी यावेळी गावक-यांना केले. दरडी कोसळण्याचे शास्त्रीय कारण-क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांची परिमाणे समान असतात. परंतू त्यांच्या दिशा परस्पर विरोधी असतात. हा न्युटनाचा गतीसबंधीचा नियम आहे. त्यानुसार डोंगर उतार असमतोल करणारे मानवी अतिक्रमण ही झाली क्रिया. तर त्यामुळे समतोल ढळून दरडी कोसळणे ही निसर्गाची प्रतिक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले़(वार्ताहर)