शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अपयशाचीही जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे : नितीन गडकरींचा इशारा कोणाकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 18:14 IST

यशाप्रमाणेच अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे असे वक्तव्य पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पुणे : यशाप्रमाणेच अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे असे वक्तव्य पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. तीन राज्यांच्या निवडणुकीत पराभव झाल्यावर आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी गडकरी पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. गडकरी यांनी पंतप्रधानपदात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले असले तरी अशा परिस्थितीत त्यांचे हे वक्तव्य कोणासाठी आहे याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

                      पुण्यातील जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेडच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अ‍ॅड. साहेबराव टकले, विजय ढेरे या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात बँकींग क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या ३६ बँकांच्या प्रतिनिधींचा  सन्मान करण्यात आला.यावेळी गडकरी म्हणाले की,  यशाचे अनेक बाप असतात. पण अपयश अनाथ असते.त्यामुळे यशाप्रमाणेच अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे असे ते म्हणाले.                    पुढे ते म्हणाले की, येता काळ बँकींग क्षेत्रासाठी अडचणीचा आहे. त्यामुळे कायदा वाकवा मात्र, तो मोडणार नाही याचे भान ठेवा. एखादी चूक झाल्यास नागरीक जाब विचारतील. सहकार क्षेत्राविषयी लोकांमध्ये विश्वास कसा निर्माण होईल हे पाहिले पाहीजे. आज एकही खाते अनुत्पादित (एनपीए) होणारच नाही, असे नाही. याचा अर्थ कोणा संचालकांनी चुकीचा व्यवहार करु नये. अशा संचालकांना शिक्षा व्हायलाच हवी. मात्र, सरसकट सर्व संचालकांना जबाबदार धरुन चालणार नाही. सहकारी बँकीग क्षेत्राने या पुढे व्यावसायिक दृष्टीकोन (प्रोफेशनल अ‍ॅप्रोच) ठेवून काम केले पाहीजे. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण