शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातून नेत्यांसह समर्थक बारामतीत; पवार कुटुंबियांना पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘गोविंदबाग’ गजबजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 12:54 IST

यंदा कोविड संकट दूर झाल्याने गोविंदबाग चांगलीच फुलल्याचे चित्र होते

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार,विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह सर्व पवार कुटुंबिय त्यांची दिवाळीनिमित्त बारामतीत असतात. यानिमित्त सर्व कुटुंबिय एकत्र येतात. यावेळी सर्वजण पाडव्यानिमित्त गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला भेटतात. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात. हि परंपरा त्यांनी अनेक वर्षांपासुन जपली आहे. बुधवारी (दि २६) पाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी  राज्यातुन गर्दी झाली होती. यावेळी मोठ्या रांगा लागल्याचे चित्र होते. शेकडोंच्या संख्येने वाहनांची गर्दी झाली होती.

कोविड संकटात पाडवा शुभेच्छांसाठी गोविंदबाग फुलली नसल्याचे चित्र होते. यंदा कोविड संकट दूर झाल्याने गोविंदबाग चांगलीच फुलल्याचे चित्र होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,  आमदार रोहित पवार शरयु कारखान्याचे कार्यकारी संचालक युगेंद्र पवार सकाळी ८ वाजल्यापासुन शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार, पार्थ पवार यांची देखील  यावेळी उपस्थिती होती. यावेळी पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यासाठी राज्यातील ‘व्हीआयपी’ देखील रांगेत होते. आमदार  दत्तात्रय भरणे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार यशवंत माने, आमदार दिलीप मोहिते, माजी आमदार रमेश थोरात आदी बड्या नेत्यांनी पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.

राज्यभरातुन आलेल्या वाहनांच्या रांगा लाबल्या होत्या. परिसरातील दोन किलोमीटरचे रस्ते वाहनांच्या ‘पार्किंग’ने भरुन गेले होते. कार्यकर्ते केवळ शुभेच्छा देण्यासाठी दोन ते तीन तास रांगेत थांबल्याचे चित्र होते. आज झालेल्या गर्दीमध्ये युवकांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. यावेळी अनेकांनी आपल्या आवडत्या नेत्याबरोबर छायाचित्र, सेल्फी काढण्याची संधी साधली.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे