शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस यांच्याकडून पिंपरी शहरातील कोरोना परिस्थिती,उपाययोजनांचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 13:19 IST

मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाला 100 हुन अधिक रुग्णांची भर पडत आहे.

ठळक मुद्देशिस्तप्रिय भाजपकडून फिजिकल डिस्टन्स चे तीनतेरामोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित

पिंपरी : महानगरपालिका परिसरातील कोरोना साथ आजाराचा आढावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी घेतला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास भेट दिली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सचे तीन तेरा वाजले होते. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी पावणे एकच्या सुमारास वायसीएम रुग्णालयाला भेट दिली.  यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर उषा ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, भाजपा शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी खासदार, राज्यसभा सदस्य अमर साबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे,  प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे आदी उपस्थित होते.

पिंपरीतील वायसीएम रुग्णालय हे कोरोना रुग्णासाठी समर्पित केले आहे. त्यामुळे याठिकाणी फक्त कोरोना रुग्णांना प्रवेश दिला जातो.  पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विषयीची माहिती घेण्यासाठी फडणवीस हे आले होते. दुपारी साडेबाराची वेळ असल्याने भाजपचे कार्यकर्ते दुपारी बारापासून हॉस्पिटलमध्ये गर्दी करून होते. फडणवीस यांचे पावणे एकच्या सुमारास आगमन झाले होते. त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे फिजिकल डिस्टन्स इन चे तीन तीन तेरा वाजले होते.देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील कोरोनाची परिस्थिती, महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची संपूर्ण माहिती घेतली. वायसीएम रुग्णालय हे साठी समर्पित केले आहे. दरम्यान, फडणवीस यांचे आगमन होताच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली. त्यामुळे केल्याने सुरक्षित अंतर, फिजिकल डिस्टनचा मात्र फज्जा उडाला. शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात दिवसाला 100 हुन अधिक रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना आटोक्यात आणण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर