शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ढिम्म प्रशासन आणि ठेकेदाराचा कामचलाऊपणा ; कोंढणपुर रस्ताच वाहून गेल्याने आठ गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 19:54 IST

गेल्यावर्षी २५ सप्टेंबरला झालेल्या पावसामध्येसुद्धा हा रस्ता वाहून गेला होता.

खेड शिवापूर : ढिम्म प्रशासन आणि कामचलाऊ ठेकेदार हे आपल्याकडे विकसन मार्गातील खरे मोठे अडथळे आहेत. त्यांच्या हलगर्जीपणाचा भुर्दंड हा नागरिकांना सोसावा लागतो.याचाच प्रत्यय शिवगंगा खोऱ्यातील पुणे-सातारा महामार्ग ते कोंढणपुर हा रस्ता आज दुपारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे आलेल्या पुरात आर्वी (ता. हवेली) येथील सागराची ताल याठिकाणी रस्ता वाहून गेला.यामुळे घेरा सिंहगड परिसरातील कोंढणपूर, राहटवडे, अवसरवाडी, कल्याण, शिवतारेवाडी व भिलारवाडी पेठ या आठ गावांचा संपर्क तुटला आहे.

             गेल्या वर्षी २५ सप्टेंबर यादिवशी झालेल्या पावसामध्ये याच ठिकाणी रस्ता वाहून गेला होता. त्यावेळी ठेकेदाराकडून तात्पुरती व्यवस्था केली गेली होती. तातडीने याठिकाणी पूल बांधण्याचे काम सुरु होईल व तो पुल लवकरात लवकर पूर्ण होईल अशा प्रकारची माहिती संबंधित विभागाने नागरिकांना हमी दिली होती. मात्र आजपर्यंत एक वर्षे उलटून गेल्यानंतरही याठिकाणी पुलाचे काम अर्धवटच केलेले आहे. या अर्धवट पुलापासून वरील गावांना जाण्यासाठी चार सिमेंटच्या नळ्या टाकून एक एक छोटासा तात्पुरता रस्ता या ठिकाणी करण्यात आला होता. मात्र, संबंधित रस्ते ठेकेदाराकडून या कामांमध्येही कुठलीच प्रगती नसून मागील वर्षीप्रमाणे आजही काम अपुरेच आहे. नागरिकांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही संबंधित विभागाकडून या रस्त्यात ठेकेदाराला काम पूर्ण करण्याबाबत कुठल्याही प्रकारची सूचना किंवा तंबी देण्यात आलेली नाही.

  आता हा रस्ता वाहून गेल्या कारणाने वरील आठ गावांचा संपर्क तुटलेला आहे.त्यामुळे यापुढेही याठिकाणी मोठ्या अपघात होण्याचीही शक्यता आहे. संबंधित ठेकेदारावर पांघरूण घालून अजून किती दिवस नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागेल याबाबत नागरीकांमध्ये संभ्रम  आहे.

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीRainपाऊस