शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Lawrence Bishnoi | सलमान खान धमकी पत्राची महाकालला होती माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 18:16 IST

पॅन इंडियात बिष्णोई टोळीचा संपर्क...

पुणे : अभिनेता सलमान खान याला धमकीचे पत्र देण्यात येणार असल्याचे माहिती असल्याची कबुली सौरभ महाकाल ऊर्फ सिद्धेश कांबळे याने पुणे पोलिसांकडे दिली आहे. त्याच्याकडे पंजाब तसेच मुंबई पोलिसांच्या पथकाने चौकशी केली आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्याकडे मुंबई पोलिसांच्या पथकाने चौकशी केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक सध्या दिल्लीत असून ते बिष्णोईकडे चौकशी करणार आहे. तसेच संतोष जाधव याच्याकडेही बिष्णोई टोळीशी त्याचा कसा संबंध आला, याचा तपास केला जाणार आहे.

सौरभ महाकाल याला गेल्या आठवड्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडले. त्यानंतर गेले चार दिवस त्याच्याकडे पंजाब, मुंबई पोलिसांबरोबरच ग्रामीण पोलिसांनी चौकशी केली. त्यात त्याने पंजाब, हरियाणा येथे रेकी केल्याचे सांगितले. तसेच राजस्थान, दिल्ली येथे संतोषबरोबर काम केल्याचे महाकाल सांगतो. सलमान खान यांच्या धमकी पत्राबाबत आपल्याला माहिती असल्याचे तो सांगतो. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा विक्रम ब्रार याच्याशी महाकाल याचा संतोष जाधवमार्फत संपर्कात होता. महाकाल याने दिलेली माहिती संतोष जाधवच्या चौकशीत पडताळून पाहण्यात येणार आहे. त्यातून संतोष जाधव व इतरांचा मुसेवाला हत्येप्रकरणी किती संबंध होता, यावर अधिक प्रकाश पडणार आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित ७ ते ८ वेगवेगळी माहिती हाती आली आहे. त्याचा तपास सुरु आहे.

पॅन इंडियात बिष्णोई टोळीचा संपर्कबिष्णोई टोळीचा संपूर्ण देशभरात नेटवर्क आहे. त्यात अनेक जण एकमेकांना ओळखतही नाही. त्यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क आहे. अन्य राज्यातील पोलीस दलाशी समन्वयातून याची माहिती पोलीस घेत आहे.

इन्स्ट्राग्राममार्फत महाकाल होता संपर्कातसौरभ महाकाल हा इन्स्ट्राग्राममार्फत बिष्णोई टोळीशी संपर्कात होता. त्यावरुन पोलिसांना अनेक बाबी समोर येऊ लागल्या आहेत.

घटना पंजाबात, कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांची

मुसेवाला हत्येची घटना पंजाबात घडली असली तरी मीडियातील बातमीनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने शोध घेऊन त्यातील संशयित तिघांना आतापर्यंत पकडले आहे.

सलग २५ तासांचा प्रवासशनिवारी रात्री संतोष जाधव व सूर्यवंशी याला मांडवी येथे पकडण्यात आले. ग्रामीण पोलिसांच्या दोन पथकांनी दोघांना वेगवेगळ्या गाडीतून सलग २५ तास प्रवास करुन रविवारी रात्री पुण्यात आणले.

टॅग्स :PuneपुणेSalman Khanसलमान खानCrime Newsगुन्हेगारी