शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

"यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापर होतोय, मी अनावश्यक कलामांच्या विरोधात" - असीम सरोदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 18:29 IST

शाईफेकी साठी कलम 307 जीवे मारण्याचा प्रयत्न हे कलम का लावायला सांगण्यात आले?

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री शनिवारी चिंचवड दौऱ्यावर असताना त्यांच्यावर शाईफेक झाली. याप्रकरणी पोलिसांनी समता सैनिक दल संघटक मनोज घरबडे, समता सैनिक दल सदस्य धनंजय इजगज आणि वंचित बहुजन आघाडी सचिव विजय ओव्हाळ या तिघांना अटक केली. खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, घोषणाबाजी, मानहानी, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)/१३५ नुसार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी मध्यस्थी केली आहे.  मी अनावश्यक कलमांचा वापर करण्याचा विरोधात असल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले आहे. 

सरोदे म्हणाले, कुणावर तरी शाई फेकणे, बूट किंवा चप्पल मारून फेकणे हा राग व्यक्त करण्याचा, इन्स्टंट न्याय हवा असण्याचा प्रकार लोकशाहीत बसत नाही. चंद्रकांत दादांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण त्यांनी ज्या प्रकारे स्वतःचे मत मांडले तो अभिव्यक्तीचा गैरवापर व चुकीची अभिव्यक्ती आहे. ते गैरवर्तन आहे. मी अनावश्यक कलमांचा वापर करण्याचा विरोधात आहे. कलम 326 शस्त्राचा वापर करून गंभीर दुखापत करणे या गुन्ह्यासाठी सुद्धा 10 वर्षे (किंवा जन्मठेप) अशी शिक्षा होऊ शकते. मग शाईफेकी साठी कलम 307 जीवे मारण्याचा प्रयत्न हे कलम का लावायला सांगण्यात आले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

 लीगल टीम आरोपींची केस मोफत चालवेल

शाइफेक प्रकरण-कलम 307 म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे. व 120 ब,आर्म्स ऍक्ट चा वापर अतिरेकीपणा आहे. यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे. त्यामुळे आमची लीगल टीम आरोपींची केस मोफत चालवेल. परंतु शाईफेकीचा व बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध असल्याचे ते म्हणाले आहेत. 

 हा न्यायतत्वाचा अपमान 

 शाईफेक प्रकरण म्हणजे गैरवर्तनाला गैरवर्तनाने उत्तर देण्याचा अराजकता निर्माण करण्याचा प्रकार आहे. पण म्हणून सत्तेचा वापर करून अनावश्यक कलमे लावणे हा न्यायतत्वाचा अपमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलAsim Sarodeअसिम सराेदेadvocateवकिलPoliceपोलिस