शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अभिजात मराठी भाषा संवर्धन विभाग सुरू करावा : नाट्यसंमेलनाध्यक्षांचे विनोद तावडे यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 08:00 IST

 केंद्राकडून मराठीला अभिजात भाषा मिळाला नाही तर मराठी संवर्धन राज्य सरकार करणार नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारनेच मराठी भाषा संवर्धनासाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करावा अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करावी ‘मराठी’ ही राज्याची मातृभाषा, तिला अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास

पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, बारावीपर्यंत मराठी भाषेच्या सक्तीचा कायदा करावा अशा मागण़्यांसाठी माजी आणि आजी साहित्य संमेलनाध्यक्ष पुढे सरसावले असताना त्यात आता 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रेमानंद गज्वी यांच्या नावाचीही भर पडली आहे. ‘मराठी’ ही राज्याची मातृभाषा आहे. तिला अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. भाषा सल्लागार समितीने अहवालाद्वारे मराठी ही अभिजात भाषा असल्याचे सिद्ध केले आहे. याबाबत जर केंद्र सरकार मान्यता देत नसेल तर राज्य सरकारनेच मराठी भाषा संवर्धनासाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करावा आणि त्याबाबत अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करावी अशा आशयाचे पत्र डॉ. प्रेमानंद गज्वी यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना दिले आहे.  केंद्राकडून मराठीला अभिजात भाषा मिळाला नाही तर मराठी संवर्धन राज्य सरकार करणार नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ज्याप्रमाणे भाषा संचलनालय आहे. त्याच धर्तीवरच अभिजात मराठी भाषा संवर्धनासाठी स्वतंत्र विभाग सुरू करावा अशी मागणी विनोद तावडे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आणि विरोधी पक्षनेत्यांनाही पत्राद्वारे केली असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आजही न्यायालयाची भाषा इंग्रजी आहे. भारतात कुठेही गेले तरी इंग्रजीचाच वापर होतो. लोकांचीच मागणी जर इंग्रजी शाळांची असेल तर काय करणार? ही मानसिकता बदलल्याशिवाय मराठीविषयीचे चित्र बदलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.चौकट‘‘मराठी शाळा बंद पडलेल्या, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, बारावीपर्यंत मराठी सक्तीची करण्यासंदर्भातला कायदा अशा विविध विषयांवर साहित्यिकांनी आपली ठोस भूमिका जाहीर केली आहे. मात्र त्या भूमिका पुरेशा आहेत का? मराठी शिकवा असे नुसते म्हणून उपयोग आहे का? त्यातून पोटापाण्याचे प्रश्न सुटणार आहेत का? हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. आधी मराठी ही ज्ञानभाषा आणि व्यवहाराची भाषा व्हायला हवी त्यानंतरच लोकांचे प्रश्न सुटतील आणि ते पुन्हा मराठीकडे वळू शकतील. जे मराठी शिका असे सांगतात त्यांची मुलेच इंग्रजी भाषेत शिकतात. इतकी दुटप्पी भूमिका बघायला मिळते. जे मराठीविषयी गळे काढतात त्यांनी आपली मुले कुठे शिकतात? हे आधी जाहीर करावे,’’ असे डॉ. गज्वी म्हणाले.----------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेmarathiमराठीGovernmentसरकारVinod Tawdeविनोद तावडे