शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

गेल्या वर्षीचाच पीक विमा रखडला, राज्य सरकारकडून १,८७७ कोटींचे देणे, हजारो शेतकरी वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 06:20 IST

विम्याच्या हप्त्यापेक्षा भरपाईचे दावे कमी आल्यामुळे सात विमा कंपन्यांकडून राज्य सरकारला १,३७२ कोटी रुपये परत मिळणार आहेत. 

- नितीन चौधरीपुणे : आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारने पंतप्रधान खरीप विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीचे अद्याप १,८७७ कोटी रुपये न दिल्याने सहा जिल्ह्यांमधील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभांपासून वंचित राहावे लागले आहे. त्यासोबतच युनायटेड इंडिया कंपनीला ३२ कोटी, तर भारतीय कृषी विमा कंपनीला २०० कोटी रुपयांचे देणे आहे. दरम्यान, विम्याच्या हप्त्यापेक्षा भरपाईचे दावे कमी आल्यामुळे सात विमा कंपन्यांकडून राज्य सरकारला १,३७२ कोटी रुपये परत मिळणार आहेत. 

गेल्या वर्षीच्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा व चंद्रपूर या सहा जिल्ह्यांसाठी ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. या सहाही जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचे दावे ११० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने नियमानुसार अतिरिक्त रक्कम राज्य सरकारने देणे गरजेचे आहे. त्यानुसार ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीला राज्य सरकारकडून १ हजार ८७७ कोटी रुपयांचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे या सहा जिल्ह्यांमधील हजारो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.

मात्र, ही नुकसानभरपाई लवकरच मिळेल, त्यासंदर्भात कृषी सचिवांनी राज्य सरकारच्या वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे, असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. तर ३१ ऑगस्टपूर्वी या सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, असे विमा कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त राज्य सरकारकडून युनायटेड इंडिया विमा कंपनीला ३२ कोटी, तर भारतीय कृषी विमा कंपनीला २०० कोटी रुपयांचे देणे आहे. याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.

कंपन्यांकडून मिळणार फरक खरीप पीक विमा योजनेतील बीड पॅटर्ननुसार १०० टक्क्यांपेक्षा कमी नुकसान भरपाई असल्यास ८०-११० या सुत्रानुसार विमा कंपनीला देण्यात आलेला हप्ता नुकसान भरपाईच्या दाव्यापेक्षा जास्त असल्यास विमा कंपनीचा २० टक्के नफा वगळून उर्वरित रक्कम राज्य सरकारला देणे बंधनकारक आहे.त्यानुसार आयसीआयसीआय, युनिव्हर्सल सोम्पो, युनायटेड इंडिया, चोलामंडलम, भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी आणि रिलायन्स या सात कंपन्यांकडून सरकारला १,३७२ कोटी रुपये परत मिळणार आहेत.

राज्य सरकारला परत मिळणारी रक्कम आयसीआयसीआय    २०३युनिव्हर्सल सोम्पो    १३५युनायटेड इंडिया    ९३चोलामंडलम    २१ भारतीय कृषी विमा    १५४ एचडीएफसी    ३८५रिलायन्स    ३८१ एकूण    १,३७२

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र