मुंबई-पुणे गॅस वाहिनीचे काम अंतिम टप्प्यात : गॅस वाहतुक खर्चात होणार बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 12:01 PM2019-03-28T12:01:18+5:302019-03-28T12:07:31+5:30

हिंदुस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून उरण ते पुणे या दरम्यान तब्बल १६० किलोमीटर अंतराची गॅस वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

The last phase of the work of Mumbai-Pune Gas pipeline : Savings will be made on gas transportation charges | मुंबई-पुणे गॅस वाहिनीचे काम अंतिम टप्प्यात : गॅस वाहतुक खर्चात होणार बचत

मुंबई-पुणे गॅस वाहिनीचे काम अंतिम टप्प्यात : गॅस वाहतुक खर्चात होणार बचत

Next
ठळक मुद्देदररोज सव्वाशे अवजड टँकरची वाहतूक होणार कमी पुण्याला दररोज २ हजार १०० टन गॅसचा पुरवठासुरक्षेच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने टँकरची वाहतुक अधिक जिकीरीची हिंदुस्थान आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांना दररोज प्रत्येकी ८०० आणि आयओसीला ५०० टन गॅसची गरजतीन महिन्यांत प्रत्यक्षात गॅस वाहिनीद्वारे द्रव स्वरुपातील गॅस मिळण्यास सुरुवात होणार

पुणे : शहराला स्वयंपाकासाठी आणि औद्योगिक कारणासाठी वितरीत होणाऱ्या लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसची (एलपीजी) वाहतुक आणखी जलद आणि स्वस्त होणार आहे. मुंबई-पुणे या गॅस वाहिनीचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर वाहिनीची चाचणी झाल्यानंतर पुढील दोन ते तीन महिन्यांत प्रत्यक्षात गॅस वाहिनीद्वारे द्रव स्वरुपातील गॅस मिळण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती इंडियन ऑईल  कॉर्पोरेशनच्या (आयओसी) अधिकाऱ्यांनी दिली. 
आयओसीच्या चाकण येथील प्रकल्पाला नुकतेच २५ वर्षे पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रकल्प पाहणी कार्यक्रमांतर्गत ही माहिती देण्यात आली. इंडियन ऑईलच्या उप महाप्रबंधक अंजली भावे, पश्चिम विभागाचे मावळते उपमहाप्रबंधक सुरेश अय्यर, चाकण येथील प्रकल्पाचे उपमहासंचालक राजीव शर्मा, मुख्य व्यवस्थापक एच. जी. भरवाणी, वरीष्ठ व्यवस्थापक चेतन पटवारी या वेळी उपस्थित होते. आयओसीच्या चाकण येथील प्रकल्पातून २७ जिल्ह्यांना गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. या प्रकल्पाची क्षमता दररोज ३२ हजार सिलिंडर भरण्याची आहे. 
चाकण प्रकल्पाचे उप महाव्यवस्थापक राजीव शर्मा म्हणाले, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांना उरण येथून गॅस पुरवठा होतो. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून उरण ते पुणे या दरम्यान तब्बल १६० किलोमीटर अंतराची गॅस वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील तीन महिन्यांत वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर वाहिनीची चाचणी झाल्यानंतर प्रत्यक्ष पुरवठा देखील सुरु होईल. पुण्याला दररोज २ हजार १०० टन गॅसचा पुरवठा होतो. त्यासाठी सुमारे सव्वाशे टँकरची आवश्यकता असते. सुरक्षेच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने टँकरची वाहतुक अधिक जिकीरीची असते. ही वाहिनी पूर्ण झाल्यानंतर अवजड वाहतूक बंद होईल. 
हिंदुस्थान आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांना दररोज प्रत्येकी ८०० आणि आयओसीला ५०० टन गॅसची गरज आहे. वाहिनीद्वारे तळेगाव येथील हिंदुस्थिान पेट्रोलियम, चाकण येथील आयओसी आणि शिक्रापूरच्या भारत पेट्रोलियमला गॅसने वाहतुक होईल. वाहतुकीच्या खर्चात बचत होईल. मुंबई-पुणे या मार्गावर होणारी जड वाहनांची वाहतुक कमी होईल. या शिवाय कर्नाटकला मुंबई ऐवजी पुण्यातुन गॅस वाहतुक होईल. त्यामुळे दीडशे किलोमीटरचे अंतर वाचेल. 

Web Title: The last phase of the work of Mumbai-Pune Gas pipeline : Savings will be made on gas transportation charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.