शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेरचा प्रवास होणार सुखकर ; अंत्यविधीसाठी लागणारे मयत पासेस आता ऑनलाईन उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 13:02 IST

पुण्याची लोकसंख्या सुमारे ४० लाखाच्या वर आहे. दर महिन्याला पुणे शहरात सुमारे तीन हजार नागरिक मरण पावतात...

ठळक मुद्देमहापालिकेची रुग्णालये, क्षेत्रिय कार्यालये, ससून आणि विश्रामबाग वाडा येथे पासेसची व्यवस्थाया सुविधेची चाचणी पूर्ण झाली असून, लवकरच याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार

पुणे : अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच्या पाससाठी करावी लागणारी धावपळ आता थांबणार असून, अंत्यसंस्कार करण्यासाठी ऑनलाईन पासेस आता उपलब्ध करून दिले जाणार आहे.        या निर्णयामुळे शहरातील कुठल्याही रुग्णालयामध्ये एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास, त्याच हॉस्पिटलमधून महापालिकेच्या पीएमसी केअर या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. या सुविधेची चाचणी पूर्ण झाली असून, लवकरच याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त श्रीनिवास कंदुल यांनी दिली.        पुण्याची लोकसंख्या सुमारे ४० लाखाच्या वर आहे. दर महिन्याला पुणे शहरात सुमारे तीन हजार नागरिक मरण पावतात. विविध धार्मिक रिवांजांनुसार शहारामध्ये जवळपास प्रत्येक भागात स्मशान आणि दफन भूमी आहेत. या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेच्या मयत पासेस महत्वाचे असतात.        महापालिकेच्यावतीने मागील काही वर्षात महापालिकेची रुग्णालये, क्षेत्रिय कार्यालये, ससून आणि विश्रामबाग वाडा येथे पासेस देण्याची व्यवस्था केली आहे. परंतू महापालिकेची काही रुग्णालये आणि क्षेत्रिय कार्यालये संध्याकाळी बंद झाल्यानंतर बरेचदा तेथे कर्मचारी नसल्याने नागरिकांना अगदी उपनगरातून विश्रामबाग वाडा अथवा ससून रुग्णालयात जावे लागते. वैकुंठ स्मशानभूमी मध्ये पासेस देण्याची व्यवस्था आहे. परंतू तेथेही रात्री दहा वाजल्यानंतर कर्मचार्‍या अभावी पासेस मिळत नाही. यामुळे रात्रीच्यावेळी अंत्यसंस्कार करण्यात अडचणी आणि विलंब लागतो.        या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने मयत पासेस ऑनलाईन मिळतील, अशी व्यवस्था केली आहे. शहरातील कुठल्याही हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाल्यास तेथूनच ऑनलाईन पाससाठी अर्ज करता येणार आहे. महापालिकेच्या पीएमसी केअर या वेबसाईटवर हा फॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वैकुंठ, कैलास आणि येरवडा स्मशानभूमीमध्ये संगणक बसविण्यात आले आहेत.  याठिकाणी असलेल्या कर्मचार्‍यांना हॉस्पीटलमध्ये भरलेला फॉर्म, फॉर्म क्रमांक व अन्य तपशील पाहता येणार आहेत. तसेच अन्य ठिकाणच्या स्मशानभूमी आणि दफन भुमीमध्येही कर्मचार्‍यांना ऑनलाईन पास पाहता येणार आहेत.       दरम्यान अनेकदा ज्येष्ठ नागरिक आणि काही व्याधींनी त्रस्त असणार्‍यांचा घरीच मृत्यू होतो. सद्यस्थितीत नगरसेवकांच्या पत्रावरुन अशा व्यक्तिंच्या अंत्यसंस्कारांसाठी पासेस दिले जातात. परंतू  आता घरीच मृत झालेल्या व्यक्तिंच्या अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन पासेस देण्यासाठी नगरसेवकांचे पत्र अथवा डॉक्टरांनी दिलेले मृत्यूचे प्रमाणपत्र पाससाठी ऑनलाईन फॉर्म भरताना स्कॅन करून जोडण्याबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहितीही कंदुल यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाonlineऑनलाइन