शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘लष्कर’चा अतिरेकी जुनैद मोहम्मद पुण्यात जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 08:20 IST

जुनैद मोहम्मद अता मोहम्मद (वय २८) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एटीएसला यासंबंधी ३० डिसेंबर २०२१ रोजी गुप्त माहिती मिळाली होती.

पुणे : राज्यात घातपाती कृत्य घडवून आणण्यासाठी पुण्यातील तरुणाला लष्कर-ए-तय्यबा (एलईटी) या संघटनेत भरती केल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)ने उघडकीला आणले. याला दापोडी परिसरातून अटक केली आहे.

जुनैद मोहम्मद अता मोहम्मद (वय २८) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एटीएसला यासंबंधी ३० डिसेंबर २०२१ रोजी गुप्त माहिती मिळाली होती. चौकशीनंतर प्रकार समोर येताच मुंबईतील एटीएसच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यात घातपाती कृत्यांसाठी काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून याला पैसे पुरवण्यात आले, असा आरोप त्याच्यावर आहे. जुनैद हा मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील असून, दीड वर्षापासून पुण्यात राहत आहे. त्याच्या तीन साथीदारांचा एटीएस शोध घेत आहे. हे तिघेही मूळचे जम्मू-काश्मीर येथील राहणारे असून, ते लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित आहेत. जुनैदच्या साथीदाराने २०२१ ते एप्रिल २०२२ दरम्यान अन्सर गझवात हिंद/तवाहिद नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. ग्रुपच्या माध्यमातून देशविरोधी व दहशतवादासंबंधी पोस्ट टाकत असे. याच ग्रुपमध्ये जुनैद सहभागी असल्याचे तपासात आढळले. जुनैद वेगवेगळ्या मोबाइल कंपनींचे १० सीमकार्ड वापरल्याने निष्पन्न झाले. फेसबुकवर ५ अकाउंट्स तयार करून ‘लष्कर-ए-तय्यबा’मध्ये भरतीसाठी प्रोत्साहित करीत होता. 

टॅग्स :PuneपुणेTerror Attackदहशतवादी हल्लाArrestअटक