आंबेगाव तालुक्यात गेले दीड महिन्यापासून युरिया खताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST2021-06-18T04:08:06+5:302021-06-18T04:08:06+5:30
पिकांना नत्र खताची म्हणजे युरियाची आवश्यकता आहे. सध्या युरिया खताची सोयाबीन, भुईमूग आणि इतर पिकांसाठी मागणी आहे. मात्र, ...

आंबेगाव तालुक्यात गेले दीड महिन्यापासून युरिया खताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा
पिकांना नत्र खताची म्हणजे युरियाची आवश्यकता आहे. सध्या युरिया खताची सोयाबीन, भुईमूग आणि इतर पिकांसाठी मागणी आहे. मात्र, युरियाची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. अशात काही दुकानदारांकडे युरिया आहे; पण ते इतर रासायनिक खते घेतल्याशिवाय युरिया देत नसल्याचे सांगण्यात येत आहे. आंबेगाव तालुका हा शेतीप्रधान तालुका असून शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी होणाऱ्या कृषी विभागाच्या बैठकातून शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते यांचा तुटवडा भासू देणार नाही, असे आश्वासन दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात ते पाळले जात नसल्याची चर्चा शेतकरी करत आहेत. तालुक्यातील विविध ठिकाणांहून युरियासाठी विचारणा होते; परंतु उपलब्ध नसल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे. युरिया उपलब्ध असणाऱ्या कृषिसेवा केंद्राच्या सक्तीमुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली आहे. रासायनिक खतांची गरज नसताना ते खत शेतकऱ्यावर बळेच दिले जात आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
--