पार्किंगसाठी मोजावी लागणार मोठी रक्कम
By Admin | Updated: January 17, 2016 03:30 IST2016-01-17T03:30:05+5:302016-01-17T03:30:05+5:30
नवीन सार्वजनिक वाहनतळ धोरणानुसार रस्त्यावरील पार्किंगसाठी मोठी रक्कम मोजण्याची तयारी नागरिकांना ठेवावी लागणार आहे. पार्र्किं ग दर किती असावेत याचा अंतिम निर्णय मुख्य

पार्किंगसाठी मोजावी लागणार मोठी रक्कम
पुणे : नवीन सार्वजनिक वाहनतळ धोरणानुसार रस्त्यावरील पार्किंगसाठी मोठी रक्कम मोजण्याची तयारी नागरिकांना ठेवावी लागणार आहे. पार्र्किं ग दर किती असावेत याचा अंतिम निर्णय मुख्य सभेकडून घेतला जाणार आहे. मात्र सध्या आकारले जात असलेल्या पार्र्किं ग दराच्या चौपट रक्कम पार्किंग शुल्क म्हणून मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.
वाहनतळाचे शुल्क हे वाहनतळाची मागणी आणि वाहनतळाची उपलब्ध जागा यानुसार निश्चित केले जाणार आहेत. सार्वजनिक वाहनतळ धोरणानुसार पार्किंगशुल्क ठरविताना ए, बी, सी व डी असे ४ भाग पाडले जाणार आहेत.
ए क्षेत्रामध्ये (गावठाण परिसर) दुचाकींसाठी प्रत्येक तासाला २० रुपये, चारचाकीसाठी ७० रुपये, खासगी बससाठी ३५५ रुपये, मिनीबससाठी १४० रुपये, ट्रकसाठी १९५ रुपये तर टेम्पोसाठी ९० रुपये, असे साधारणपणे दर निश्चित करण्यात आले आहेत. बी क्षेत्रामध्ये दुचाकींसाठी प्रत्येक तासाला १५ रुपये, चारचाकीसाठी ५० रुपये, खासगी बससाठी २५० रुपये, मिनीबससाठी १०० रुपये, ट्रकसाठी १३५ रुपये तर टेम्पोसाठी ९० रुपये असणार आहे. सी क्षेत्रामध्ये (मोबिलिटी कॅरिडोअरपासून ५०० मीटरपर्यंत) दुचाकींसाठी प्रत्येक तासाला १० रुपये, चारचाकीसाठी ३५ रुपये, खासगी बससाठी १७५ रुपये, मिनीबससाठी ७० रुपये, ट्रकसाठी ९५ रुपये तर टेम्पोसाठी ४५ रुपये असे दर साधारणपणे निश्चित करण्यात आले आहेत. डी क्षेत्रामध्ये (निवासी क्षेत्र) दुचाकींसाठी प्रत्येक तासाला ५ रुपये, चारचाकीसाठी ३० रुपये, खासगी बससाठी १५० रुपये, मिनीबससाठी ६० रुपये, ट्रकसाठी ८५ रुपये तर टेम्पोसाठी ४० रुपये असे दर ठरविण्यात आले आहेत.
धाडसी निर्णय घ्यावा लागणार
दिल्लीमध्ये वाहनांचे वाढते प्रदूषण आणि वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर सम-विषय क्रमांकानुसार वाहने रस्त्यावर आणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याचपद्धतीने सार्वजनिक वाहतुकीचा कमी वापर करून जास्तीत जास्त वैयक्तिक वाहनांचा वापर होत असलेल्या पुण्यामध्ये पार्र्किं ग, पदपथाचा वापर याबाबत धाडसी निर्णय घ्यावा लागणार आहे. याला विरोध करण्यापूर्वी हा निर्णय घ्यावा लागण्यामागची कारणे समजुन घेण्याची आवश्यकता महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
निवासी पार्किंग धोरण
प्रत्येक प्रभागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सवलतीच्या दरात निवासी पार्र्किं ग परवाने दिले जाणार आहेत. हा परवाना त्या प्रभागापुरताच वैध असेल, इतर प्रभागांत वाहन लावल्यास त्या प्रभागानुसार दर आकारले जातील. रस्त्यावरील उपलब्ध पार्र्किं गच्या
काही जागा त्या-त्या प्रभागातील रहिवाशांसाठी राखीव असणार आहेत. मात्र प्रत्येक रहिवाशाला पार्किंगसाठी जााग ठरवून दिली जाणार नाही.
त्याला उपलब्ध जागेनुसार पार्किंग करावे लागेल.