भाषेचा अभिमान हा श्वासोच्छ्वासासारखा : बाबासाहेब पुरंदरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 13:34 IST2018-02-05T13:32:15+5:302018-02-05T13:34:46+5:30
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात रस्त्यांवरील पाट्याही शुद्ध मराठीत लिहिल्या जात नाहीत. नव्या पिढीला शुद्ध मराठी भाषेत बोलता यायला हवे, भाषेचा अभिमान हा श्वासोच्छ्वासासारखा आहे, मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.

भाषेचा अभिमान हा श्वासोच्छ्वासासारखा : बाबासाहेब पुरंदरे
पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात रस्त्यांवरील पाट्याही शुद्ध मराठीत लिहिल्या जात नाहीत. नव्या पिढीला शुद्ध मराठी भाषेत बोलता यायला हवे, भाषेचा अभिमान हा श्वासोच्छ्वासासारखा आहे, मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.
सुशील माधव न्यासाच्या वतीने मराठी हस्तलिखित केंद्राचे संचालक निवृत्त ग्रंथपाल वा. ल. मंजूळ यांना भक्तिसेवा पुरस्कार आणि संस्कृत साधना पुरस्कार निखिल भालेराव यांना प्रदान कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या वेळी न्यासाचे आनंद माडगूळकर, राधाकांत देशपांडे उपस्थित होते. मंजूळ यांची हरी मिरासदार आणि डॉ. भाग्यलता पाटसकर यांनी मुलाखत घेतली. अडीच हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरंदरे पुढे म्हणाले, की संस्कृत भाषेकडे फारसे दिले जात नाही. शिवाजीमहाराजांची मुद्रा संस्कृत तर त्यांच्या आई-वडिलांची मुद्रा पर्शियन भाषेत होती. पुणे विद्येचे माहेरघर असल्याने प्रत्येक तालुक्यात संमेलने व्हायला हवीत. पूर्वीच्या काळात संस्कृतला प्राधान्य दिले गेले. पुढील काळातही देण्याची गरज आहे. शिवाजीमहाराजांनी संस्कृतचा आदर, सन्मान केला.
मंजूळ म्हणाले, की मामासाहेब दांडेकर यांच्या आदेशावरून भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत काम करायला सुरुवात केली. हस्तलिखिते गोळा करण्याचे काम माझ्यावर आले. १८८५ ची हस्तलिखिते मुंबईतून पुण्यात आणली.