शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

यंदा पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा आॅलम्पियाड होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 6:45 PM

यंदाच्या वर्षीपासून पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा आॅलम्पियाड ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देयंदाच्या वर्षी सातारा, सांगली, पुणे आणि मुंबईमधून जवळपास १९०० विद्यार्थीपरीक्षेचा प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ जुलै

पुणे : मराठी भाषेमध्ये दर्जेदार लिहिती-वाचती पिढी निर्माण व्हावी यासाठी भाषा संस्थेच्या वतीने यंदाच्या वर्षीपासून पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा आॅलम्पियाड ही परीक्षा घेण्यात येणार आहे. जाणता वाचक, जिज्ञासू अभ्यासक आणि कसदार लेखक घडविण्याच्या दृष्टीने भाषा संस्थेतर्फे २०१५ साली शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा आॅलम्पियाड ही अभिनव स्पर्धा घेण्यास सुरूवात झाली. तीन वर्षांमध्ये चौथी आणि सातवीसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेला महाराष्ट्रातील इंग्रजी-मराठी माध्यमांच्या शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या वर्षी सातारा, सांगली, पुणे आणि मुंबईमधून जवळपास १९०० विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. या परीक्षेची उपयुक्तता, लोकप्रियता तसेच पालक व शिक्षकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा पाचवी व सहावीसाठी या परीक्षांची आखणी करण्यात आली असल्याची माहिती भाषा संस्थेच्या अध्यक्षा स्वाती राजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.राजे म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या मनात भाषेच्या गोडीचे बीज रूजावे यासाठी रंजक परीक्षेची बांधणी करण्यात येत असून, ज्ञान, आकलन उपयोजन व कौशल्य या चार घटकांचा विचार त्यात करण्यात आला आहे. परीक्षेचे साचेबद्ध स्वरूप न ठेवता शब्दांशी खेळत भाषेचे सहज सुंदर रूप विद्यार्थ्यांच्या समोर यावे अशा अनेक कृती त्यामध्ये समाविष्ट केल्या आहेत. मुलाच्ंया भाषिक बुद्धिमतेच्या विकासाच्या अनुषंगाने या परीक्षेत भाषिक आकलनाबरोबरच विश्लेषण, अभिव्यक्ती, विचारातील सुसंगती आणि नवनिर्मिती, क्षमता अशा अनेक घटकांचा अंतर्भाव केला जात आहे. भाषेच्या जतनासाठीची मुलभूत पातळीवरची दीर्घकालीन योजना म्हणून रंजक व अभ्यासपूर्ण परीक्षेकडे पाहिले जावे. या परीक्षेचा प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ जुलै आहे. परीक्षेस बसू इच्छिणाऱ्यांनी भाषा फाऊंडेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Puneपुणेmarathiमराठीexamपरीक्षाStudentविद्यार्थी