शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोला पालिकेकडून विनानिविदा देणार जागा  : स्थायीची मंजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 15:48 IST

मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गालगत पार्किंग आणि स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहामेट्रोच्या पार्किंग आणि स्थानकासाठी बोपोडी जकात नाक्याची जागा२ हजार ४०० चौरस मीटर जागा हस्तांतरीत करण्यासाठीचा प्रस्ताव

पुणे : स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये महामेट्रोला बोपोडी येथील जागा विना निविदा देण्यास मंजुरी देण्यात आली. पार्किंग आणि स्थानकासाठी या जागेची आवश्यकता असल्याचे समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महामेट्रोकडून पालिकेकडे यासंदर्भात प्रस्ताव आलेला होता. मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गालगत पार्किंग आणि स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे. बोपोडी येथील जुना जकात नाका सर्व्हे नं. १० येथील सुमारे २ हजार ४०० चौरस मीटर जागा हस्तांतरीत करण्यासाठीचा हा प्रस्ताव होता. ही जाना तीन एकर, तीन गुंठे असून पालिकेने ही जागा जकात नाक्यासाठी संपादीत करुन ताब्यात घेतलेली होती. या जागेवर महापालिकेचा दवाखाना असून सुमारे २०० चौरस मीटर जागा पोलीस ठाण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आलेली आहे. तर काही जागा रुंदीकरणामध्ये बाधित झाली आहे. उर्वरित जागा महामेट्रोला देण्यात येणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. पालिका जागा देत असली तरी काही अटी घालण्यात आलेल्या आहेत. मिळकतीलगत सीमाभिंत बांधणे, जागेलगतच्या परिसराची देखभाल आणि संरक्षण करणे ही मेट्रोची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये पालिकेच्या आर्थिक दायित्वामधून जा जागेची सहा कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांची किंमत वजा करावी आणि स्वामित्वापोटी दरवर्षी एक रुपया नाममात्र भाडे आकारावे, ३० वर्ष कालावधीसाठी ही जागा हस्तांतरीत करण्याविषयी प्रशासनाने अभिप्राय दिला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMetroमेट्रो